• Download App
    पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी सातवा दहशतवादी महमंद इस्लाम अल्वीच्या रूपात मारला गेला; चिनार कॉर्पसच्या कमांडरने लक्षात आणून दिले महत्त्व Seven out of the 19 accused terrorists of the Pulwama attack have been killed, seven others have been arrested, five are still absconding: IGP Kashmir Vijay Kumar

    पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी सातवा दहशतवादी महमंद इस्लाम अल्वीच्या रूपात मारला गेला; चिनार कॉर्पसच्या कमांडरने लक्षात आणून दिले महत्त्व

    वृत्तसंस्था

    श्रीनगर – जम्मू – काश्मीरमध्ये लेथपोरा, पुलवामा हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी महंमद इस्लाम अल्वी याला सुरक्षा दलांनी चकमकीत कंठस्नान घातले. त्याच्याबरोबर दुसराही दहशतवादी मारला गेला आहे. अल्वी हा पाकिस्तानात पळून गेलेला कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबांशी संबंधित होता. Seven out of the 19 accused terrorists of the Pulwama attack have been killed, seven others have been arrested, five are still absconding: IGP Kashmir Vijay Kumar

    महमंद इस्लाम अल्वीला दहशतवाद्यांमध्ये लंबू उर्फ अदनान उर्फ सैफुल्ला या नावांनी देखील संबोधले जायचे. तो आदिल दर याच्या सोबत फिदायिन हल्ल्याच्या दिवसापर्यंत राहात होता. त्याचा जो विडिओ व्हायरल झाला त्यामध्ये अली दरचा आवाज आहे. आणि तो सुरक्षा दलांनी टिपला आहे, अशी माहिती देखील पोलीसांनी दिली.

    लंबू उर्फ सैफुल्ला उर्फ अदनान हा चकमकीत ठार झाल्याने पुलवामा हल्ल्यात जे १९ दहशतवादी सामील झाले होते, त्यापैकी सातवा दहशतवादी ठार झाला आहे. लंबू उर्फ सैफुल्ला हा पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडपैकी एक होता, अशी माहिती मिळाल्याचे चिनार कॉर्पसचे कमांडर लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी दिली

    महमंद इस्लाम अल्वी याचा लेथपोरा, पुलवामा हल्ल्याच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत हात होता. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या आरोपपत्रात त्याच्या विरूध्द पुरावे असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, त्याची नोंद फरार आरोपी म्हणून करण्यात आली होती. त्याच बरोबर तो २०१९ मध्ये जुनैदपुरा हल्ल्यात देखील सामील असल्याचे पोलीसांनी सांगितले.

    सैफुल्ला ठार झाल्यामुळे पुलवामा हल्ल्यात सामील झालेल्या दहशतवाद्याला कंठस्थान घातल्याचे समाधान सुरक्षा दलांना मिळाल्याचेही लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी पत्रकारांना सांगितले.

    Seven out of the 19 accused terrorists of the Pulwama attack have been killed, seven others have been arrested, five are still absconding: IGP Kashmir Vijay Kumar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांबरोबरच पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन यात्रेत देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख सहभाग

    Abu Dhabi : इस्रायल-इराण युद्ध, अबू धाबीमध्ये इराणी हल्ल्यात भारतीय जखमी; दूतावासाने म्हटले- ते आता धोक्याबाहेर आहेत, भारतात 15 हून अधिक शहरांमध्ये निदर्शने

    T20 World Cup 2026 : भारत टी-20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये; 5 मार्चला इंग्लंडशी भिडणार, वेस्ट इंडीजचा 5 विकेट्सनी पराभव; सॅमसनच्या नाबाद 97 धावा