वृत्तसंस्था
श्रीनगर – जम्मू – काश्मीरमध्ये लेथपोरा, पुलवामा हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी महंमद इस्लाम अल्वी याला सुरक्षा दलांनी चकमकीत कंठस्नान घातले. त्याच्याबरोबर दुसराही दहशतवादी मारला गेला आहे. अल्वी हा पाकिस्तानात पळून गेलेला कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबांशी संबंधित होता. Seven out of the 19 accused terrorists of the Pulwama attack have been killed, seven others have been arrested, five are still absconding: IGP Kashmir Vijay Kumar
महमंद इस्लाम अल्वीला दहशतवाद्यांमध्ये लंबू उर्फ अदनान उर्फ सैफुल्ला या नावांनी देखील संबोधले जायचे. तो आदिल दर याच्या सोबत फिदायिन हल्ल्याच्या दिवसापर्यंत राहात होता. त्याचा जो विडिओ व्हायरल झाला त्यामध्ये अली दरचा आवाज आहे. आणि तो सुरक्षा दलांनी टिपला आहे, अशी माहिती देखील पोलीसांनी दिली.
लंबू उर्फ सैफुल्ला उर्फ अदनान हा चकमकीत ठार झाल्याने पुलवामा हल्ल्यात जे १९ दहशतवादी सामील झाले होते, त्यापैकी सातवा दहशतवादी ठार झाला आहे. लंबू उर्फ सैफुल्ला हा पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडपैकी एक होता, अशी माहिती मिळाल्याचे चिनार कॉर्पसचे कमांडर लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी दिली
महमंद इस्लाम अल्वी याचा लेथपोरा, पुलवामा हल्ल्याच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत हात होता. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या आरोपपत्रात त्याच्या विरूध्द पुरावे असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, त्याची नोंद फरार आरोपी म्हणून करण्यात आली होती. त्याच बरोबर तो २०१९ मध्ये जुनैदपुरा हल्ल्यात देखील सामील असल्याचे पोलीसांनी सांगितले.
सैफुल्ला ठार झाल्यामुळे पुलवामा हल्ल्यात सामील झालेल्या दहशतवाद्याला कंठस्थान घातल्याचे समाधान सुरक्षा दलांना मिळाल्याचेही लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी पत्रकारांना सांगितले.
Seven out of the 19 accused terrorists of the Pulwama attack have been killed, seven others have been arrested, five are still absconding: IGP Kashmir Vijay Kumar
महत्त्वाच्या बातम्या
- नास्तिक CPIचा प्रभू श्रीरामांना लाल सलाम : कम्युनिस्टांचे रामायणावर वर्ग; राइट विंग आणि संघाला आव्हान देण्याची तयारी
- Assam-Mizoram Border Dispute : मिझोराम पोलिसांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल केला एफआयआर, 1 ऑगस्टला ठाण्यात हजर राहण्यास सांगितले
- Covid-19 Vaccine : काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी अखेर घेतली कोरोनाची लस, पहिला डोस घेतल्यामुळे राहुल गांधी दोन दिवसांपासून संसदेत गैरहजर
- देशात तिसरी लाट केरळमधून येण्याची भीती, कोरोना रुग्णसंख्या वाढतेय ; ईशान्य भारतात परिस्थिती बिकट
- Tokyo Olympics : अतनु दासपाठोपाठ बॉक्सर अमित पंघालही बाहेर ; कमलप्रीत कौर फायनलमध्ये