सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) समोर एक समस्या निर्माण झाली आहे. त्यांना लसीच्या निर्यातीशी संबंधित मंजुरी मिळालेली नाही. SII ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कंपनीच्या कोवोव्हॅक्स लसीच्या निर्यातीला परवानगी देण्याची विनंती केली आहे. याशिवाय यासंदर्भात ‘सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ (CDSCO) कडूनही मंजुरी मागितली आहे. Serum Institute of India SII Health Ministry Export Approval for Covovax Vaccine One crores Wasted By December
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) समोर एक समस्या निर्माण झाली आहे. त्यांना लसीच्या निर्यातीशी संबंधित मंजुरी मिळालेली नाही. SII ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कंपनीच्या कोवोव्हॅक्स लसीच्या निर्यातीला परवानगी देण्याची विनंती केली आहे. याशिवाय यासंदर्भात ‘सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ (CDSCO) कडूनही मंजुरी मागितली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, जर कोवोव्हॅक्स लसीला निर्यातीसाठी मान्यता मिळाली नाही तर त्याचा फटका बसू शकतो. SII ने आपल्या अर्जात म्हटले आहे की मंजूरीशिवाय कोवोव्हॅक्स लसीचे एक कोटी डोस डिसेंबर 2021 पर्यंत वाया जातील.
जगभरात कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी जलद लसीकरण केले जात आहे. यामुळेच जगभरातील देश लसीसाठी वैद्यकीय कंपन्यांशी करार करत आहेत. इंडोनेशिया आणि सीरम इन्स्टिट्यूटमध्येही असाच करार झाला आहे. इंडोनेशियाने एक कोटी लसीचे डोस खरेदी करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटशी करार केला आहे. कंपनीने आरोग्य मंत्रालयाला दिलेल्या अर्जातही याबाबत माहिती दिली आहे. कोवोव्हॅक्स लसीच्या निर्यातीनंतरही भारतात कोविड लसीचा पुरवठा खंडित होणार नाही, असे मंत्रालयाला सांगितले आहे.
भारतात कोवोव्हॅक्सच्या वापरासाठीही मंजुरी मागितली
सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे की कोविशील्ड लसीची कमतरता नाही आणि तिचा पुरेसा साठा कंपनीकडे उपलब्ध आहे. कंपनीने म्हटले आहे की अशा परिस्थितीत आम्ही सरकारला विनंती करतो की या गोष्टी लक्षात घेऊन सीरमवर लस निर्यात करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र जारी केले जावे. त्याच वेळी, सीरमने भारतात लसीकरणासाठी कोवोव्हॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मागितली आहे. मात्र, याबाबत सीडीएससीओकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. इंडोनेशियाने आपल्या देशात आपत्कालीन वापरासाठी कोवोव्हॅक्स लस मंजूर केली आहे.
कोव्होव्हॅक्स ब्रँड नावाने इंडोनेशियामध्ये होणार विक्री
दोन आठवड्यांपूर्वी Novavax Inc. आणि तिच्या संलग्न सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला इंडोनेशियामधून त्यांच्या कोविड-19 लसीसाठी आपत्कालीन वापराची मंजुरी मिळाली होती. इंडोनेशियाच्या नॅशनल एजन्सी ऑफ ड्रग अँड फूड कंट्रोलने ही लस वापरण्यास परवानगी दिली. अधिकृत निवेदनात, बायोटेक फर्मने पुष्टी केली की ही लस SII द्वारे भारतात तयार केली जाईल आणि SII द्वारे इंडोनेशियामध्ये कोव्होव्हॅक्स या ब्रँड नावाने विकली जाईल.
Serum Institute of India SII Health Ministry Export Approval for Covovax Vaccine One crores Wasted By December
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी