याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखनऊ विमानतळाजवळ एक खळबळजनक घटना समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या चालकाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. साध्वी निरंजन ज्योती यांच्या ड्रायव्हरच्या तक्रारीत दावा करण्यात आला आहे की, तो मंत्रीमहोदयास घेण्यासाठी विमानतळावर जात असताना एका व्यक्ती मंत्र्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत कारमध्ये घुसला.Sensational Incident Near Lucknow Airport An attempt to kidnap Union Minister Niranjan Jyoti
मंत्री साध्वी कारमध्ये उपस्थित नव्हत्या. कार घेऊन पळून जाणाऱ्या अपहरणकर्त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. चालकाच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस चौकशी करत आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार साध्वी निरंजन ज्योती या विमानाने दिल्लीहून लखनऊला येत होत्या.
सकाळी त्यांचा चालक त्यांना घेण्यासाठी जात होता. त्याचवेळी बंथारा पोलीस ठाणे हद्दीतील न्यू प्रधान धाब्याजवळ चालकाने चहा पिण्यासाठी गाडी थांबवली. दरम्यान, त्या तरुणाने तेथे पोहोचून कारमध्ये बसलेल्या गनरला कारमधून ढकलून दिले आणि कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेराव घालून कार थांबवली आणि तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बंथारा पोलिसांनी आरोपीविरुद्ध मंत्र्याच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Sensational Incident Near Lucknow Airport An attempt to kidnap Union Minister Niranjan Jyoti
महत्वाच्या बातम्या
- निवडणुकीपूर्वी हरियाणा काँग्रेसमध्ये पुन्हा फूट; हुड्डा आणि शैलजा यांची स्वतंत्र यात्रा
- दिल्ली मद्य धोरण प्रकरण: केजरीवाल चौथ्यांदा EDसमोर हजर होणार नाहीत!
- “पुरोगामीत्वा”च्या स्वलिखित नोंदी; रामविरोधाच्या “ऐतिहासिक चुकीची” कबुली!!
- 300 विमाने उड्डाणाच्या प्रतीक्षेत, दोन दिवसांत प्रवासी संख्या तब्बल 40 हजारांनी घटली!