विशेष प्रतिनिधी
केरळ : कोल्लम जिल्ह्यातील चेन्नपारा भागात काही लोकांनी लष्कराच्या जवानावर हल्ला केल्याची घटना समोर आली होती. यासोबतच जवानाला मारहाण केल्यानंतर त्याच्या पाठीवर पीएफआय या बंदी असलेल्या संघटनेचे नाव लिहिल्याचा आरोपही करण्यात आला. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला. आता मंगळवारी पोलिसांनी याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. Sensational disclosure in case of writing PFI on soldiers back in Kerala
कोल्लम पोलिसांनी या प्रकरणी मोठा खुलासा केला असून ही संपूर्ण कहाणी लष्कराच्या जवानानेच रचल्याचे म्हटले आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा आम्ही जवानाच्या ओळखीच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, ‘जवानाने स्वत: त्या व्यक्तीला पाठीवर पीएफआय लिहून त्याचे हात पाय बांधण्यास सांगितले होते.
याप्रकरणी पोलिसांनी शाईनच्या मित्राला ताब्यात घेतले होते. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘शाईनने मला त्याच्या पाठीवर असे लिहायला सांगितले होते. मला वाटले की तो DFI लिहायला सांगत आहे पण तो म्हणाला नाही, PFI लिहा. यानंतर त्याने हात टेपने बांधण्यास सांगितले. हे काम करून मी तिथून निघालो.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाइन असे त्या जवानाचे नाव असून तो कोल्लमचा रहिवासी आहे. सध्या ते राजस्थानमध्ये तैनात असून रजेवर गावी आले आहेत. शाइनच्या घराची झडती घेतली असता तेथे हिरवा रंग आणि टेप सापडल्याचेही पोलिसांनी सांगितले. खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी शाइनला ताब्यात घेतले आहे.
Sensational disclosure in case of writing PFI on soldiers back in Kerala
महत्वाच्या बातम्या