• Download App
    काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य - सचिन पायलटांना डावलण्याची पुनरावृत्ती; तेलंगणा जिंकणाऱ्या रेवंत रेड्डींच्या मुख्यमंत्री पदात ज्येष्ठांची आडकाठी!! Seniors stand in the way of Telangana winning Chief Minister Revanth Reddy

    काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य – सचिन पायलटांना डावलण्याची पुनरावृत्ती; तेलंगणा जिंकणाऱ्या रेवंत रेड्डींच्या मुख्यमंत्री पदात ज्येष्ठांची आडकाठी!!

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : काँग्रेस कोणतीही निवडणूक जिंकू किंवा हरो पक्षातली गटबाजीची संस्कृती बदलत नाही, हेच काँग्रेसमधल्या नेत्यांनी वारंवार दाखवून दिले. जे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंच्या बाबतीत झाले, राजस्थानात सचिन पायलट्यांच्या बाबतीत झाले, तेच तेलंगणात रेवंत रेड्डींच्या बाबतीत घडत आहे!! Seniors stand in the way of Telangana winning Chief Minister Revanth Reddy

    मध्य प्रदेश जिंकून देऊनही 2018 मध्ये काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदेंना मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवले. सचिन पायलट यांना राजस्थानात मुख्यमंत्रीपदापासून डावलले. तोच उद्योग आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेलंगणात रेवंत रेड्डी यांच्या बाबतीत करत आहेत. तेलंगणात काँग्रेसला जिंकून देऊन रेवंत रेड्डी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार होते. राजभवनात त्या शपथविधीची तयारी देखील झाली होती, पण आयत्यावेळी शपथविधीचा कार्यक्रम रद्द केल्याची बातमी आली. कारण रेवंत रेड्डी यांच्या मुख्यमंत्री पदाला तेलंगणातल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी अडथळा आणल्याची बातमी आहे.

    मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रचंड कष्ट करून 2018 मध्ये काँग्रेसची सत्ता आणली होती, पण काँग्रेस हायकमांडने ज्योतिरादित्य शिंदे यांना बाजूला ठेवून कमलनाथांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. हेच त्यांनी त्यावेळी राजस्थान देखील केले. राजस्थानात सचिन पायलट यांनी त्यावेळी पायाला भिंगरी लावून फिरत राजस्थान काँग्रेसच्या राजस्थानात काँग्रेसला जिंकून दिले, पण काँग्रेस सचिन पायलट यांना डावलले आणि अशोक गेहलोत यांच्यात गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली.

    त्याचे परिणाम काँग्रेस 2023 मध्ये भोगावे लागले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडली. ते आज आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आहेत, पण कमलनाथांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मध्य प्रदेशची निवडणूक गमावली. राजस्थान देखील अशोक गेहलोत आपले सरकार टिकवू शकले नाहीत, पण यातून कोणताही धडा न शिकता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तेलंगणातल्या पक्षाला जिंकून देणाऱ्या रेवंत रेड्डींना विरोध सुरू केला आहे.

    पक्षाचे 7 वेळा खासदार राहिलेले आणि राजीव गांधी बरोबर त्यावेळी असलेले उत्तम कुमार रेड्डी, दलित नेते भट्टी विक्रमार्क, कोमाटी वेंकट रेड्डी, दामोदर राज नरसिंह आदी वरिष्ठ नेते रेवंत रेड्डींच्या मुख्यमंत्रीपदात अडथळा ठरत आहेत. आपली ज्येष्ठता ढवळून रेवंत रेड्डींना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देणे योग्य नसल्याचे त्यांनी काँग्रेस हायकमांडला कळविले आहे.

    राहुल – प्रियांका डळमळले

    पण राहुल आणि प्रियांका गांधी यांनी रेवंत रेड्डींवर विश्वास टाकत त्यांच्यावर तेलंगण निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. त्यात ते पूर्ण यशस्वी झाले. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी त्यांचेच नाव पुढे केले गेले, पण आता वर उल्लेख केलेले वरिष्ठ नेते त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला विरोध करत असल्याने राहुल आणि प्रियंका गांधी रेवंत रेड्डींच्या पाठीशी ठामपणे उभे राहू शकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नियोजित केलेला राजभवनातला शपथविधी रद्द करावा लागला आहे.

    Seniors stand in the way of Telangana winning Chief Minister Revanth Reddy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!