• Download App
    वरिष्ठ अधिकारी महिलाही नाहीत सुरक्षित, छान ड्रेस घालता, फ्रेश दिसता म्हणून शेरेबाजी करणाऱ्या तरुणास अटक|Senior woman officials also not safe, young man arrested

    वरिष्ठ अधिकारी महिलाही नाहीत सुरक्षित, छान ड्रेस घालता, फ्रेश दिसता म्हणून शेरेबाजी करणाऱ्या तरुणास अटक

    विशेष प्रतिनिधी

    नगर : शासनामध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यां चा रुबाब वेगळाच असतो. परंतु, बाईपणाचे ओझे त्यांनाही बाळगावे लागते. विकृतांकडून त्रास होतो असे शेवगाव येथे काम करणाऱ्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या उदाहरणावरून पुढे आले आहे. या अधिकाऱ्याला अश्लिल शेरेबाजी, मेसेज करून त्रास देणाऱ्या तरुणाविरुध्द शेवटी तक्रार दाखल करावी लागली.Senior woman officials also not safe, young man arrested

    शेवगाव तालुक्यात महत्वाच्या पदावर असलेल्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा तरुण अश्लील शेरेबाजी करणे, अश्लील मेसेज पाठविणे, बदनामी करणे,



    एकटी असताना कार्यालयीन कक्षात जाण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारे त्रास देत होता. त्याला विरोध केल्याने खोट्या तक्रारी आणि आंदोलने करू लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली, शेवगाव) याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

    महिला अधिकाऱ्याने शेवगाव पोलीस ठाण्यात सुरूवातीला त्या तरुणाच्या विरोधात तक्रार अर्ज केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी यावर चौकशी केली. तथ्य आढळून आल्याने मंगळवारी बलदवा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    फियार्दीमध्ये म्हटले आहे की, बलदवा त्यांना फोन करुन, कार्यालयात चकरा मारुन ओळख वाढवण्याचा प्रयत्न करायचा. मी आपल्याला अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी मदत करतो, त्यातून येणारे पैसे मी तुम्हाला पोहच करत जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा.

    माझ्याजवळ तुमचे मन हलके करत जा, असे म्हणून तो महिला अधिकाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्यावर पाळत ठेवत होता. तुम्ही छान ड्रेस घालता. त्यामुळे तुम्ही छान व फ्रेश दिसतात अशी शेरेबाजेही करीत होता. त्यावर अधिकाऱ्यांनी त्याला तंबी देऊन केवळ कार्यालयीन कामासंबंधीच बोलावे, असे सांगितले.

    तरीही त्याने पाठलाग करणे सुरूच ठेवले. त्यानंतर तो त्यांच्या कामात ढवळाढवळ करू लागला. त्यांच्या विरोधात अर्ज करून आणि फोन करून त्रास देऊ लागला. उपोषणाचा इशारा देऊन त्यासाठी फलक छापून घेतले. त्यावर विचित्र फोटो छापून अधिकाऱ्यांची बदनामी केली. त्यांचे पती व मुली बद्दल वाईट बोलत असे. त्यांनीही मेसेज करून चुकीची आणि बदनामीकारक माहिती देत असे.

    Senior woman officials also not safe, young man arrested

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार