प्रतिनिधी
मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्राने २०२३ -२०२४ या वर्षासाठी नोकर भरती सुरु केली आहे. श्रेणी II आणि III मध्ये विशेषज्ञ अधिकाऱ्यांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी बँकेच्या bankofmaharashtra.in या वेबसाईटवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना तपासावे, असे सांगण्यात आले आहे. Senior positions in Bank of Maharashtra job opportunity
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या भरतीत मुख्यतः श्रेणी II आणि III मध्ये २२५ विशेषज्ञ अधिकारी पदे भरली जाणार आहे. उमेदवाराने अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठातील सर्व सेमेस्टर/वर्षांच्या एकूण किमान ६०% गुणांसह पूर्ण केलेने असावे. भारत सरकार किंवा तिच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे, अट घालण्यात आली आहे.
वयोमर्यादा
भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा किमान २५ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावी.
अर्ज फी
UR/EWS/OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १००० रुपये असणार आहे. SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. उमेदवार डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क जमा करू शकतात.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या एकत्रित गुणांवर आधारित असेल.
Senior positions in Bank of Maharashtra job opportunity
महत्वाच्या बातम्या