विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची उद्या अभिजीत मुहूर्तावर प्रतिष्ठापना होण्याच्या आदल्या दिवशी एक “चमत्कार” झाला. आत्तापर्यंत तिथल्या कार्यक्रमातल्या विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे भाषा अचानक बदलली आणि त्यांनी मीडियालाच “अँटी मोदी” ठरवत आपल्या आधीच्या वक्तव्यांची जबाबदारी त्याच्यावर ढकलली आणि मोदींची स्तुती केली. Self-respect of Hindus was awakened by Modi
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, “सत्य हे आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे हिंदूंचा स्वाभिमान जागृत झाला, ही सामान्य बाब नाही. आम्ही अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे, आम्ही मोदीविरोधी नाही, तर मोदींचे प्रशंसक आहोत. आम्ही त्यांचे कौतुक करतो कारण स्वतंत्र भारतात इतका धाडसी, हिंदूंसाठी खंबीरपणे उभा राहणारा दुसरा कोणताही पंतप्रधान झाला नाही. आम्ही कोणावरही टीका करत नाही, कारण सगळे पंतप्रधान आपापल्या परीने चांगले होते त्यांची काही गुणवैशिष्ट्ये होती, पण हिंदूंच्या भावनांना पाठिंबा देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. हिंदू म्हणून, आम्ही विरोधात आहोत काय??, बिलकुल नाही.
पण तुमचा, मीडियाचा एकच अजेंडा आहे – आम्हाला म्हणजे शंकराचार्यांना “अँटी मोदी” सिद्ध करायचे. पण मला सांगा, जेव्हा पंतप्रधानांनी त्यांच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून कलम 370 रद्द केले तेव्हा आम्ही त्याचे स्वागत केले. नागरिकता कायदा आला त्यावेळी त्याचेही आम्ही स्वागतच केले समान नागरी कायद्यातल्या काही धार्मिक चिंता स्पष्टपणे सांगून आम्ही त्याचेही स्वागत केले त्यामुळे आम्ही मोदी विरोधात बिलकुल नाही, असे अविमुक्तानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले.
हे तेच शंकराचार्य आहेत, जे कालपर्यंत राम जन्मभूमी मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापने विषयी विविध धार्मिक शंका उपस्थित करून मोदी सरकारला घेरत होते. परंतु प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी मात्र त्यांची बदललेली भूमिका समोर आली आहे.
Self-respect of Hindus was awakened by Modi
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरी मुस्लिमांकडून श्री रामलल्लांच्या सेवेसाठी 2 किलो ऑरगॅनिक केशर; अभिषेकासाठी अफगाणिस्तानच्या नदीतूनही आले पाणी!!
- सानिया मिर्झाला सोडून शोएब मलिकने केले तिसरे लग्न
- मराठा समाजाचे मागासलेपण सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी पासून युध्दपातळीवर; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
- मनीलाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी हेमंत सोरेनची घरी पोहचली EDची टीम