• Download App
    दोन महिला लष्करी अधिकारी बनणार लढाऊ हेलिकॉप्टरच्या वैमानिक ; प्रशिक्षणासाठी निवड। Selection of two female military officers for pilot training

    दोन महिला लष्करी अधिकारी बनणार लढाऊ हेलिकॉप्टरच्या वैमानिक ; प्रशिक्षणासाठी निवड

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :  भारतीय लष्कराने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . त्या अंतर्गत लढावू हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली आहे. Selection of two female military officers for pilot training

    लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी वैमानिक म्हणून महिलांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केले.त्या नंतर सहा महिन्यांनी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. या दोन महिला अधिकारी महाराष्ट्रातील नाशिक येथील लढावू लष्कर उड्डयन प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण घेतील. १५ महिला अधिकाऱ्यांनी लष्कराच्या उड्डयन दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती.



    तथापि, दोनच महिला अधिकारी कठोर निवड प्रक्रियेतून पात्र झाल्या. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढल्या वर्षी या दोन महिला अधिकारी लष्कराच्या उड्डयण दलाच्या सेवेत रुजू होतील. २०१८ मध्ये फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी लढावू विमानाच्या पहिल्या भारतीय सारथी होऊन भारतीय वायुदलाच्या इतिहासात नवा अध्याय जोडला होता. मागच्या वर्षी भारतीय नौदलानेही महिला वैमानिकांची पहिली तुकडी डॉर्नियर सागरी विमान विभागात तैनात करण्याची घोषणा केली होती.

    Selection of two female military officers for pilot training

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tatanagar : आंध्र प्रदेशमध्ये टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग, 1 जणाचा मृत्यू; 2 एसी डबे जळाले

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय