Encounter in Pulwama : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांसह एका साथीदाराचा खात्मा करण्यात आला. यादरम्यान सैन्यातील एक जवानही शहीद झाला आहे. Security Forces Killed 5 terrorist in Encounter in Pulwama Jammu Kashmir
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांसह एका साथीदाराचा खात्मा करण्यात आला. यादरम्यान सैन्यातील एक जवानही शहीद झाला आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने पुलवामा जिल्ह्यातील राजपुराच्या हाजिन या गावात घेराबंदी करून शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्यामुळे ही कारवाई चकमकीत बदलली. या गोळीबाराला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले.
सुरुवातीच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला, त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवले आली आणि चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या चार दहशतवाद्यांचा संबंध लष्कर-ए-तैयबाशी असून एक मूळचा पाकिस्तानी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील दानिश मंजूर, पाकिस्तानचा रेहान, निषाद हुसेन लोना ऊर्फ खिताब आणि हाजन पायीनचा आमिर वागिया अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. एकाची ओळख पटलेली नाही.
Security Forces Killed 5 terrorist in Encounter in Pulwama Jammu Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- डिजिटल पेमेंट्समध्ये वाढ, यूपीआयने नोंदवला नवा विक्रम, जूनमध्ये सर्वाधिक 5.47 लाख कोटींचे व्यवहार
- गडकरींनी सांगितली इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्राची योजना, ईव्ही फायनान्स इंडस्ट्रीचीही उभारणी
- ममतांना हायकोर्टाचा दणका : हिंसाचारातील पीडितांना उपचार, रेशन देण्याचे आदेश, सर्व गुन्ह्यांच्या नोंदी आवश्यक!
- ‘राहुल गांधींचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?’, लसीवरील ट्वीटवरून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारले
- बॉलीवूडकडे ईडीचा मोर्चा, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अभिनेत्री यामी गौतमला समन्स, नुकतेच झाले होते लग्न