मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
विशेष प्रतिनिधी
जम्मू : Bandipora उत्तर काश्मीरमधील बांदीपोरामध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी एका स्थानिक दहशतवाद्याला अटक करून टार्गेट किलिंगचा कट उधळून लावला. सध्या या दहशतवाद्याची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांदीपोरा पोलिसांना काही दिवसांपूर्वी एक स्थानिक तरुण दहशतवादी संघटनेत सक्रिय झाल्याची आणि तो बांदीपोरामध्ये टार्गेट किलिंग करू शकतो, अशी माहिती मिळाली होती.Bandipora
पोलिसांनी संभाव्य लक्ष्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. बांदीपोरामधील काही रस्त्यांवर विशेष चौक्याही लावण्यात आल्या होत्या. संध्याकाळी सात वाजता नाका पार्टीत एक तरुण रस्त्याने चालताना दिसला. नाका पार्टी त्याला थांबण्याचा इशारा देण्यापूर्वीच या तरुणाने मार्ग बदलून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तो धावत असल्याचे पाहून नाका पार्टीने त्याचा पाठलाग करून त्याला गोळीबार करण्याची संधी न देता पकडले. वासीम अहमद मलिक असे त्याचे नाव आहे. तो गुंडपोरा रामपोरा बांदीपोरा येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक हँडग्रेनेड आणि 15 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
Security forces foil target killing plot in Bandipora Terrorist arrested
महत्वाच्या बातम्या
- पॉपकॉर्नपासून जुन्या गाड्यांपर्यंत ‘या’ वस्तू महागल्या!
- परदेशात जाणारे भारतीय म्हणजे आपल्या संस्कृतीचे राजदूत -सुनील आंबेकर
- खातेवाटपात गृहखात्यासकट फडणवीस आणि भाजपचे वर्चस्व; शिंदेंकडे खाती गृहनिर्माण आणि नगरविकास तर अजितदादांकडे अर्थ!!
- Sarangi : भाजप खासदार सारंगी अन् राजपूत यांच्या प्रकृतीबाबत आले अपडेट!