• Download App
    ‘G20’ परिषदेची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवली जात होती; परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यास अटक Secret information of G20 conference was being sent to Pakistan An employee of the Ministry of External Affairs was arrested

    ‘G20’ परिषदेची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवली जात होती; परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यास अटक

    (संग्रहित छायाचि)

    सोशल मीडियाच्या माध्यमातून G20शी संबंधित सर्व माहिती आपल्या महिला मैत्रिणीला देत होता.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गाझियाबाद पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या G20 कार्यक्रमाची माहिती लीक करणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याला अटक केली. इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. नवीन पाल असे अटक आरोपीचे नाव आहे. ज्याला लवकरच न्यायालयात हजर करून रिमांडवर घेण्यात येणार असून, या आरोपीने आतापर्यंत पाकिस्तानात कोणती माहिती पाठवली होती, याची चौकशी केली जाणार आहे. Secret information of G20 conference was being sent to Pakistan An employee of the Ministry of External Affairs was arrested

    मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादचा राहणारा आरोपी नवीन पाल हा परराष्ट्र मंत्रालयात अस्थायी कर्मचारी होता. जो बराच काळ परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो G20 शी संबंधित सर्व माहिती आपल्या महिला मैत्रिणीला देत होता. ही बाब आयबीला कळताच त्यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली.

    अनेक गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवली

    पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या आतापर्यंतच्या तपासात असे आढळून आले की, आरोपी नवीन पाल याने अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवली होती. त्यासंदर्भात काही महत्त्वाचे पुरावेही आयबीच्या हाती लागले आहेत. आयबीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका महिलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होता.

    आरोपीकडून मिळालेला महिलेचा नंबर हा व्हर्च्युअल फोन नंबर होता. जो उत्तर प्रदेश, बरेलीच्या आयडी प्रूफवर काढण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात होता, तसतसा व्हॉट्सअॅप चालवणारा इंटरनेट सर्व्हर पाकिस्तानातील कराची येथून चालत असल्याचे आढळून आले. पोलीस आरोपी नवीन पालची चौकशी करत आहेत.

    Secret information of G20 conference was being sent to Pakistan An employee of the Ministry of External Affairs was arrested

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!