विशेष प्रतिनिधी
मुंबई : एरवी विरोधक मतमोजणी झाल्यानंतर आणि आपला पराभव झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किंवा निवडणूक आयोग यांच्या विरोधात तक्रारी करतात, पण आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा पाचवा टप्पा अधिकृतरित्या संपण्याआधीच निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करत वेगवेगळ्या तक्रारी केल्या. यासाठी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली.Screaming at EVMs after Ervi results; But today, before the end of polling, Thackeray’s complaints against Election Commission!!
निवडणूक अधिकाऱ्यांना पहाटे 5.00 वाजेपर्यंत सोडू नका. तुम्ही मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय घरी जाऊ नका. जे अधिकारी तुम्हाला अडवतील त्यांची नावे शिवसेना भवनाकडे कळवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले :
- ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त पडतंय त्या ठिकाणी केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणूनबूजून विलंब केला. मतदारांना मुद्दाम ताटकळत ठेवल्याचे दिसले.
- निवडणूक आयोगाने भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम केले. मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मतदानाला जाणून बूजून वेळ केला जातोय, त्यावेळी तुम्ही जवळच्या शिवसेना शाखेला त्याची माहिती द्या.
- ज्या मतदान केंद्रावर आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणाचा अनुभव आला असेल त्या ठिकाणच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांचं नाव विचारावं, नोंद करावं. अशांची माहिती गोळा करून आम्ही कोर्टात जाऊ.
- मोदी सरकार पराभवाच्या भितीने पछाडले आहे. मतदानासाठी गेलेल्या अनेकांची नावं यादीमधून वगळली जाणे हा सरकारचा आवडता खेळ आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले.
Screaming at EVMs after Ervi results; But today, before the end of polling, Thackeray’s complaints against Election Commission!!
महत्वाच्या बातम्या
- अधीर रंजन चौधरी बंगालमध्ये लढवताहेत काँग्रेसचा उरलेला बालेकिल्ला, पण खर्गेंनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!
- कष्टाला नाही कमी, यशाची हमी : 52 दिवस : 115 सभा, माध्यमांना 67 मुलाखती; फडणवीसांचा झंझावात!!
- संघ आणि भाजप कार्यक्षेत्रे वेगळी, पण विचारप्रणाली एकच “राष्ट्र प्रथम”; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांची स्पष्टोक्ती!!
- अफगाणिस्तानात पुराचा कहर, 70 ठार, अनेकजण बेपत्ता!