विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्स भरवायची, तर हौस आहे, पण पुरेसा पैसा नाही म्हणून मग ब्रिटिश प्रवृत्तीच्या देशाने भारतीय प्रभाव असलेले 13 खेळ स्पर्धेतूनच वगळून टाकले. त्यामुळे उर्वरित फक्त 10 खेळांच्या आधारावर स्कॉटलंड कॉमनवेल्थ स्पर्धा भरवणार आहे.
स्कॉटलंड हा पूर्वी ब्रिटनचाच भाग होता. परंतु, नंतर त्याने स्वतःला स्वायत्त देश घोषित केले, तरी तो कॉमनवेल्थचाच भाग राहिला. त्या देशातल्या राज्यकर्त्यांची मूळ ब्रिटिश मनोवृत्ती गेली नाही. कॉमनवेल्थ गेम्स 2026 अखेर स्कॉटलँडच्या ग्लासगो (Glasgow) इथं भरणार आहेत. ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिाय शहराने यजमानपदासाठी नकार दिल्यानंतर स्पर्धेसाठी नव्या ठिकाणाचा शोध घेतला जात होता. अनेक अडचणींचा सामना करत अखेर ग्लासगो इथली जागा निश्चित करण्यात आली. पण ही स्पर्धा भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी निराशाजनक ठरणारी आहे. कारण या स्पर्धेत भारतीय खेळाडू हक्काची पदकं मिळवू शकतील असे खेळचं काढून टाकण्यात आले आहेत.
हे 13 खेळ कॉमनवेल्थमधून काढले
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. विशेषत: हॉकी, क्रिकेट, कुस्ती, नेमबाजी आणि बॅडमिंटन सारख्या गेम्समध्ये भारतीय खेळाडू हक्काची पदकं मिळवतात. पण हेच खेळ कॉमनवेल्थ गेम्समधून काढून टाकण्यात आले आहेत. तब्बल 13 गेम्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये नसणार आहेत. यात हॉकी, क्रिकेट, रग्बी सेवन, डायव्हिंग, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, रोड सायकलिंग, माऊंटेनबाईक, रिदमिक जिम्नॅस्टिक, स्क्वॅश, टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस, ट्रायथलॉनय पॅरा ट्रायथलॉन आणि कुस्ती
भारताच्या कामगिरीला धक्का
हॉकी, क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन या खेळात भारतीय खेळाडूंनी नेहमीच वर्चस्व गाजवलं आहे. पण 2026 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये या खेळातील पदक विजेत्या कामगिरीला धक्का बसणार आहे. भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकासाठी नेहमीच दावेदार राहिला आहे. पुरुष हॉकी संघाने गेल्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं, तर कुस्तीतही भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा राहिला. बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधु सारखे खेळाडू हक्काचे पदक विजेचे खेळाडू आहेत. 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश केला होता. भारतीय महिला संघाने यावेळी रौप्य पदक पटकावलं होतं. पण स्कॉटलंड मधल्या स्पर्धेत आता हे खेळच होणार नाहीत.
का काढण्यात आले 13 खेळ?
2026 कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद व्हिक्टोरिया शहराकडे सोपवण्यात आलं होतं. पण स्पर्धेसाठी देण्यात बजेट वाढल्याने आयोजनावर संकट ओढावलं. या स्पर्धेसाठी व्हिक्टिरिया शहराने 2.6 बिलिअन डॉलरचा निधी मंजूर केला होता. पण ही रक्कम वाढून 7 बिलिअन डॉलर इतकी झाली. त्यामुळे व्हिक्टोरिया सरकारने असमर्थता दर्शवत माघार घेतली.
स्पर्धा रद्द होण्याचा धोका असतानाच स्कॉटलंड मदतीला धावून आलं. स्कॉटलंडने 2014 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यामळे स्कॉटलंडने कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्याची तयारी दाखवली. पण बजेट कमी असल्याने काही खेळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्समध्ये केवळ 10 गेम्स खेळवण्यात येणार आहेत. यात एथलेटिक्स, स्विमिंग, बॉक्सिंग आणि सायकलिंग सारखे खेळ आहेत.
Scotland dropped 13 games from commonwealth games 2026
महत्वाच्या बातम्या
- yashomati Thakur : मुख्यमंत्रीपदासाठीच काँग्रेसने शिवसेनेला धरले ताणून; पण काँग्रेसच्या विदर्भातल्या महिला नेत्याने दिला उद्धव ठाकरेंनाच
- Modi governments : ‘आरोग्य विमा’धारकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
- Delhi Police : रोहिणी बॉम्बस्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई!
- Elon Musk : एलन मस्क म्हणाले- EVM मुळे निवडणुकीत हेराफेरी होते, बॅलेट पेपरद्वारे मतदानाचा दिला सल्ला