विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – उत्तराखंडमधील सात फेब्रुवारीला चामोलीजवळच्या रोंती शिखरावरील तब्बल २.७० कोटी घनमीटरचा महाकाय हिमकडा कोसळून हिमस्खलन झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने केला आहे.Scientist find reason behind chamoli tragedy
हिमकडा कोसळल्यावर दगड आणि बर्फाचा एका मोठा प्रवाह तयार झाला, त्याने २० मीटर आकाराची शिळा वाहून नेली. एवढेच नव्हे तर नद्यांच्या खोऱ्यांची भिंतही २२० मीटरने उंच झाली. संशोधकांनी उपग्रह प्रतिमा, भूकंपाच्या नोंदी आणि प्रत्यक्षदर्शींनी तयार केलेल्या व्हिडिओचा वापर केला.
या सर्वांच्या मदतीने हिमकडा कोसळल्यामुळे तयार झालेल्या प्रवाहाचे संगणकीय मॉडेल तयार केले. संशोधकांनी या ठिकाणांचे नकाशे आणि छायाचित्रांची प्रलयापूर्वीच्या अवस्थेशी तुलना केली.
या आपत्तीत २०० जणांचा बळी गेला होता. याचे नेमके कारण शोधण्यासाठी जगभरातील ५३ संशोधक एकत्र आले होते. हिमस्खलनामुळे बर्फ व इतर गोष्टी तसेच पाण्याची एक मोठी भिंतच रोंतीगड, ऋषीगंगा आणि धौलीगंगा नद्यांच्या खोऱ्यात कोसळली होती. नद्यांनी मार्ग वळविल्यामुळे नव्हे तर नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दगड, नुकताच वितळलेला हिमकडा कोसळून पूर आल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला.
Scientist find reason behind chamoli tragedy
महत्त्वाच्या बातम्या
- HSC Exam 2021 : ज्युनिअर कॉलेजमधील कामगिरी व अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करणार
- Maharashtra Corona Updates : राज्यामध्ये शनिवारी आढळले १०,९६२ नवीन रुग्ण, १४,९१० जणांना डिस्चार्ज; १,५५,४७४ ॲक्टिव्ह रुग्ण
- कोरोनाचा उगम नक्की कोठे, चीन व अमेरिकेत झडू लागल्या पुन्हा वादाच्या फैरी
- लहान मुलांनाही कोरोनाची लस ,इंजेक्शन नसून नेझल स्प्रेद्वारे ; रशियात सप्टेंबरपासून लसीकरण
- Dhananjay Mundhe Controversy : ट्रोल करणाऱ्यांचा घेतला समाचार मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर मांडते,माझ्यावरील बंधने हटवा करुणा मुंडे