केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) वायुप्रदूषणाची पातळी गंभीर श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे.School-office closed in Delhi from Monday, Chief Minister Kejriwal took ‘this’ decision in an emergency meeting
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरच्या ढासळत्या वातावरणात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शनिवारी ( आज ) दिल्लीची हवा अधिकच विषारी झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) वायुप्रदूषणाची पातळी गंभीर श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, पर्यावरण मंत्री गोपाल राय आणि दिल्लीचे मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत सोमवारपासून तीन दिवस सरकारी शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच वेळी, खाजगी कार्यालयांना सल्ला दिला जाईल की त्यांनी त्यांच्या जास्तीत जास्त कर्मचार्यांकडून वर्क फ्रॉम होम करून घ्यावे.
यावेळी केजरीवाल म्हणाले की, आम्ही दिल्लीत लॉकडाऊनचा विचार करत आहोत. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी काय करावे, यासाठी आम्ही प्रस्ताव तयार करत आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन सर्वोच्च न्यायालयाला कळवू.आपल्या सर्वांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे, हा प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न आहे, मला आशा आहे की दिल्लीतील लोक आम्ही उचलत असलेले कठोर पाऊल समजून घेतील आणि ते आवश्यक आहे हे मान्य करतील.
School-office closed in Delhi from Monday, Chief Minister Kejriwal took ‘this’ decision in an emergency meeting
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकारच्या या नितीचा मी निषेध करतो, अंतिम विजय हा आपलाच आहे – प्रविण दरेकर
- मुंबई दंगल १९९२ – ९३ ते अमरावती दंगल २०२१ ; शिवसेना बदलली ३६० अंशात!!
- नुसरत भारुचा हिची प्रमुख भूमिका असलेल्या छोरी सिनेमाच्या टीजरने अपेक्षा वाढवल्या
- कुठे गेले पुन्हा थायलंडचे राजे? देशात राजकीय अस्थिरता असताना पुन्हा थायलंडच्या राजाने काढला पळ