वृत्तसंस्था
ओटावा : ऑपरेशन ब्लू स्टारच्या 40व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी कॅनडामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येचा एक देखावा साकारण्यात आला. व्हँकुव्हरमध्ये हा देखावा काढण्यात आला. त्यात गोळ्यांनी चाळणी झालेला इंदिरा गांधींचा पुतळा दाखवण्यात आला होता. तसेच, त्यांचे मारेकरी बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांना इंदिरा गांधी यांच्याकडे बंदुका रोखलेले दाखवण्यात आले. Scene of Indira Gandhi’s assassination in Canada; 2 Sikh gunmen shown firing, India objects
यानंतर आज भारतीय अधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून उत्तर मागणार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी कॅनडाला लेखी तक्रार पाठवण्यात येणार असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 6 जून रोजी कॅनडातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. टोरंटोमधील आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात खलिस्तानचे झेंडे फडकावले आणि भारतीय दूतावासाबाहेर भारतविरोधी घोषणा दिल्या.
आधी जाणून घ्या काय होते ऑपरेशन ब्लू स्टार
खलिस्तान समर्थक जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांना पकडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरून 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार सुरू करण्यात आले होते. तो अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी 6 जून 1984 रोजी सैन्याने सुवर्ण मंदिर आणि अकाल तख्त साहिबमध्ये घुसून जर्नेल सिंगला ठार मारले.
या कारवाईत सुवर्ण मंदिर आणि अकाल तख्त साहिबचे नुकसान झाले. त्यामुळे शीख धर्मीयांमध्ये प्रचंड रोष होता. चार महिन्यांनंतर 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन शीख सैनिकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर दिल्लीत शीखविरोधी दंगल उसळली.
इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा सलग दोन वर्षे समोर आला आहे
जून 2023 मध्ये कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात इंदिरा गांधींच्या हत्येचा एक देखावा काढण्यात आला. यात ऑपरेशन ब्लू स्टार आणि 1984 च्या शीखविरोधी दंगलीचे बॅनरही होते.
4 जून 2023 रोजी खलिस्तानी समर्थकांनी काढलेल्या सुमारे 5 किलोमीटर लांबीच्या नगर कीर्तनात हा देखावा दाखवण्यात आला होता. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 39व्या स्मृतिदिनानिमित्त 6 जून रोजी या देखाव्याचे फोटो-व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते.
या देखाव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कॅनडातच त्याविरोधात निदर्शने सुरू झाली. सोशल मीडियावर या देखाव्याचे व्हिडीओ अपलोड करून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडे यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या मोहिमा सुरू होत्या.
Scene of Indira Gandhi’s assassination in Canada; 2 Sikh gunmen shown firing, India objects
महत्वाच्या बातम्या
- NDA 8 जून करू शकते सरकार स्थापनेचा दावा; राष्ट्रपती भवनात 9 जूनला शपथविधीची शक्यता
- दिल्ली विमानतळावर स्टालिन + चंद्राबाबू यांच्यात नुसत्याच गाठीभेटी; की NDA – INDI आघाडीत एकमेकांची सेंधमारी??
- मुस्लिम प्रभाव क्षेत्रात एकगठ्ठा मतदानाचा भाजपला देशभरात 30 % फटका!!; ममता + राहुल + अखिलेश + उद्धव या “लाभार्थीं”च्या जागा वाढल्या!!
- NDAच्या बैठकीपूर्वी नितीश सरकारने केली ‘ही’ मोठी मागणी