• Download App
    वकिलांच्या संपावर सर्वोच्च न्यायालय संतापले, वर्तन तत्त्वांना धरून नसल्याचे मत |Sc targets lawyers for strike

    वकिलांच्या संपावर सर्वोच्च न्यायालय संतापले, वर्तन तत्त्वांना धरून नसल्याचे मत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – संपामुळे किंवा बार असोसिएशनने टाकलेल्या बहिष्कारामुळे वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यास नकार देणे हे व्यावसायिक तत्त्वांना धरून नाही तसेच अशाप्रकारचे त्यांचे वर्तन हे देखील चुकीचे असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.Sc targets lawyers for strike

    वकील हा न्यायालयातील अधिकारीच असतो त्याला समाजामध्ये देखील वेगळा दर्जा असतो असे मत न्यायालयाने यावेळी नोंदविले. न्या. एम. आर. शहा आणि न्या. ए.एस.बोपन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे निरीक्षण नोंदविले.



    राजस्थान उच्च न्यायालयातील वकिलांनी २७ सप्टेंबर २०२१ रोजी पुकारलेल्या संपाबाबतच्या एका खटल्यावर सुनावणी करताना खंडपीठाने हे निरीक्षण नोंदविले. न्यायालयाचे कामकाज सुरळीतपणे चालणे हे वकिलांचेच कर्तव्य असते. ते त्यांच्या अशिलांशी बांधील असतात, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

    वकिलांनी अशाप्रकारचा संप करू नये म्हणून न्यायालयाने कायदा केला असून आम्ही अनेकदा याबाबत उघडपणे चिंता व्यक्त केली असताना देखील परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली दिसत नाही, अशी खंतही न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आली.

    Sc targets lawyers for strike

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sam Pitroda : सॅम पित्रोदा म्हणाले- पाकिस्तानमध्ये मला घरी असल्यासारखे वाटले; नेपाळ-बांगलादेशही परदेशांसारखे वाटत नाहीत

    Siddaramaiah : बंगळुरू कोर्टाने म्हटले- RSS धार्मिक संघटना नाही; CM सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार फेटाळली

    India said- : भारताने म्हटले- सौदी आमच्याशी असलेले संबंध सांभाळेल; पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध