विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – काँपिटिशन कमिशन ऑफ इंडियाने अमेझॉन व फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसाय पद्धतींसंदर्भात सुरु केलेल्या चौकशीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. SC targets Amezon, Flipcart
या चौकशीमुळे या दोन कंपन्या व सरकार यांच्यात वादंग उद्भवला होता. आपण कोणतीही चुकीची व्यापार पद्धती अवलंबली नसल्याचा या कंपन्यांचा दावा होता. आयोगाने चौकशीचा आदेश देण्यापूर्वी पुराव्यांबाबत शहानिशा केली नाही. तसेच आम्ही नेमका कोणता कायदेभंग केला हेदेखील आयोगाने दाखवून दिले नाही, असेही या कंपन्यांचे म्हणणे होते.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा दावा फेटाळून त्यांना चौकशीस सामोरे जाण्यास सांगितले. आपला कारभार पारदर्शक आहे हे दाखविण्यासाठी या बड्या कंपन्यांनी चौकशीची तयारी दाखवलीच पाहिजे. तुम्ही जर सर्व आरोप फेटाळले आहेत, तर चौकशी टाळू नका, असेही न्यायालयाने सुनावले.
त्यांना चौकशीला सामोरे जाण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. या चौकशीत कमिशनतर्फे फ्लिपकार्ट ला ३२ महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात त्यांच्या प्रमुख विक्रेत्यांची यादी, किती ऑनलाइन डिस्काउंट दिले जाते त्याचा तपशील तसेच स्मार्टफोन कंपन्यांचे फोन आपल्या साइटवर विकण्यासाठी त्यांच्याबरोबर केलेले करार, यांची माहिती मागविण्यात आली होती.
SC targets Amezon, Flipcart
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीला जोर वाढला; दीड वर्षांपासून बंद आहे सेवा
- मुंबई महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंच्या हाती शिवसेनेचा भगवा
- Ujjwala Yojana 2.0 ! पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उज्ज्वला योजना 2 चे लोकार्पण : मोफत स्टोव्ह ; LPG रिफिल ; कोट्यवधी नागरिकांना मिळणार फायदा
- Corona vaccine ; या आठवड्यात झायडस आणि सीरमच्या लसींना मिळू शकते तातडीच्या वापराची मंजुरी
- भारतातील परदेशी नागरिकांनाही मिळेल लस, सरकारने दिली मंजुरी, अशी असेल प्रक्रिया