• Download App
    ISRO शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या विरोधात खटला भरणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; सुप्रिम कोर्टाचे आदेश SC directing CBI to probe the role of ex-cops in ISRO scientist Nambi Narayanan arrest in ISRO spy case

    ISRO शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या विरोधात खटला भरणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; सुप्रिम कोर्टाचे आदेश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – ISRO चे शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या विरोधात हेरगिरीचा खटला दाखल करण्याची पार्श्वभूमी आणि खटला दाखल करणारे अधिकारी यांची सीबीआय चौकशी करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश सुप्रिम कोर्टाने आज दिले आहेत. रॉकेटरी सिनेमामुळे पुन्हा चर्चेत आलेल्या नंबी नारायण यांना यामुळे खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे. SC directing CBI to probe the role of ex-cops in ISRO scientist Nambi Narayanan arrest in ISRO spy case

    नंबी नारायण यांनी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याच बरोबर आपल्या विरोधातील हेरगिरीचा खटला खोटा आणि गैरहेतूनेच लादला होता, असा आरोप केला आहे. जे. राजशेखरन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करून सुप्रिम कोर्टाने हा निकाल दिला आहे.

    १९९४ मध्ये मी जेलमध्ये असताना जे. राजशेखरन यांनी मला सर्व प्रकारची मदत केली. त्यांनी Spies from Space या त्यांच्या पुस्तकातूनही माझ्या विरोधातील खटल्याच्या थिअरीला आव्हान दिले होते, याची आठवण नंबी नारायण यांनी करवून दिली आहे. आता सुप्रिम कोर्टाचा आदेश आल्यानंतर नंबी नारायण यांना अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अन्य अधिकारी यांचा तपास आणि चौकशी सीबीआय करणार आहे.

    नंबी नारायण यांच्या विरोधातील केसमध्ये सुप्रिम कोर्टाने २०१८ मध्ये निकाल देऊन त्यांना ५० लाख रूपयांची नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. केंद्र सरकारने त्यांना २०१९ मध्ये पद्मश्रीने सन्मानितही केले आहे.

    पण त्यांचा लढा अद्याप संपलेला नाही. क्रायोजेनिक इंजिनाच्या भारतीय बनावटीसाठी आग्रही असल्याबद्दल त्यांच्यावर हेरगिरीचा ख़टला दाखल करण्यात आला होता. त्यांना अनेकदा टॉर्चर करण्यात आले होते.

    मात्र, आज आलेल्या सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर नंबी नारायण केसच्या मूळापर्यंत सीबीआयला जाण्याची मूभा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यातून पोलीस अधिकारी, अन्य अधिकारी आणि त्यांचे राजकीय बॉस हे देखील सीबीआयच्या जाळ्यात येऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे. नंबी नारायण यांनी सुप्रिम कोर्टाच्या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

    SC directing CBI to probe the role of ex-cops in ISRO scientist Nambi Narayanan arrest in ISRO spy case

    Related posts

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया