• Download App
    SC collegium refuses to elevate Bombay HC judge as permanent judge for her insensitive ‘skin-to-skin contact’ verdict, to revert as district judge

    SC collegium : पॉक्सो कायद्यांतर्गंत वादग्रस्त निकाल देणार्या अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांना स्थायी न्यायाधीश म्हणून पदोन्नती नाहीच

    • बाल लैंगिक शोषण कायद्याखाली एका पाठोपाठ एक वादग्रस्त निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त न्या. पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांना चांगलेच भोवले आहे. SC collegium refuses to elevate Bombay HC judge as permanent judge for her insensitive ‘skin-to-skin contact’ verdict, to revert as district judge
    • न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयातील नियमित न्यायमूर्तीपदावर नेमणूक नाहीच.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पुष्पा व्ही गणेडीवाला यांना कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्यास नकार दिला आहे.याचा अर्थ न्यायमूर्ती गणेडीवाला यांचे तदर्थ न्यायाधीशपद फेब्रुवारी २०२२ मध्ये संपल्यानंतर त्या जिल्हा न्यायाधीश म्हणून परत येतील.

    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त न्या. पुष्पा गनणेडीवाला यांनी अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार व बलात्कारासंदर्भात दोन वादग्रस्त निकाल दिले होते.


    ‘पॉक्सो‘ गुन्ह्याबाबत वादग्रस्त निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका नियमित; नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे!


    गेल्या वर्षी, केंद्र सरकारने तदर्थ न्यायाधीशपदाची मुदत दोन वर्षांनी वाढवण्याच्या कॉलेजियमच्या निर्णयाशी असहमती दर्शवली होती आणि केवळ एक वर्षाची मुदतवाढ दिली होती.

    गेल्या १९ जानेवारीला न्या. गणेडीवाला यांनी त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला नसेल तर तो अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार होत नाही व आरोपींवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करता येत नाही असा निर्णय दिला होता.

    त्यानंतर २८ जानेवारीला न्या. गनेडीवाल यांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या एका ५० वर्षाच्या व्यक्तीच्या याचिकेवरही एक वादग्रस्त निर्णय दिला होता. या व्यक्तीवर पाच वर्षाच्या मुलीसमोर पँटची चेन उघडल्याचा आरोप होता पण हे कृत्य पॉस्को कायद्याखाली गुन्हा येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

    सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाच्या ३अतिरिक्त न्यायाधीशांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली, माधव जयाजीराव जामदार, अमित भालचंद्र बोरकर आणि श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी.

    SC collegium refuses to elevate Bombay HC judge as permanent judge for her insensitive ‘skin-to-skin contact’ verdict, to revert as district judge

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची