• Download App
    स्टेट बँकेतून खातेदारांना महिन्यात चार वेळाच मोफत पैसे काढता येणार | SBI will charge for withdraw money

    स्टेट बँकेतून खातेदारांना महिन्यात चार वेळाच मोफत पैसे काढता येणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : स्टेट बँकेच्या खातेदारांना आता एका महिन्यांत केवळ चार वेळेसच मोफत पैसे काढण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यापेक्षा अधिक वेळा व्यवहारावर शुल्क आकारणी केली जाणार आहे. नवीन नियम एक जुलैपासून लागू होणार आहेत. SBI will charge for withdraw money

    एसबीआयकडून आता अतिरिक्त मूल्यवर्धित सेवेसाठी पंधरा ते ७५ रुपयांपर्यंत शुल्क आकारणी केली जाणार आहे. बॅकेची शाखा, एसबीआय एटीएम किंवा अन्य बँकेचे एटीएममधून एका महिन्यात केवळ चार वेळेसच नि:शुल्क पैसे काढता येथील. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी पंधरा रुपये आणि जीएसटी आकारला जाईल.



    एटीएम आणि शाखेतून एकूण चारपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास शुल्क वसूल केले जाईल.चेकबुक सेवेसाठी एका वर्षासाठी पहिले दहा चेक हे मोफत दिले जातील. त्यानंतरच्या दहा चेकसाठी ४० रुपये, २५ चेकसाठी ७५ रुपयांचे शुल्क वसूल केले जाईल. तसेच अतिरिक्त जीएसटी आकारणी होईल. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकच्या जादा शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

    SBI will charge for withdraw money

    विशेष प्रतिनिधी

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य