सर्वोच्च न्यायालयाने दिले होता आदेश
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भारतीय निवडणूक आयोगासमोर निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यास तयार आहे. गेल्या सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला फटकारले होते आणि राजकीय पक्षांनी रोखून ठेवलेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश दिले होते.SBI ready to present electoral bond details
SBI सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे आणि मुदतींचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यास, न्यायालय “जाणीवपूर्वक अवज्ञा” म्हणून कारवाई करू शकते, असा इशाराही दिला.
SBI ला निवडणूक रोख्यांचे तपशील जाहीर करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने भारतीय निवडणूक आयोगाला 15 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइटवर माहिती प्रकाशित करा, असे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेने म्हटले आहे की ते निवडणूक रोख्यांच्या डेटासह तयार आहे. विसंगती टाळण्यासाठी डेटाचे मॅपिंग महत्वाचे होते. सुप्रीम कोर्टाने खुलासा करण्याचे आदेश दिल्यामुळे ग्राहक यापुढे नाव न छापण्याचा दावा करू शकत नाही, अशीही माहिती दिली.
SBI ready to present electoral bond details
महत्वाच्या बातम्या
- भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणीत गैरहजर
- सुप्रीम कोर्टाचा एसबीआयला आज इलेक्टोरल बाँड डेटा देण्याचे आदेश, EC ने 15 मार्चपर्यंत वेबसाइटवर टाकावा
- कृषि पणन व्यवस्थेबाबत अमुलाग्र बदलांच्या दांगट समितीच्या शिफारशी!!
- CAA ची घालून “भीती” विखुरलेल्या INDI आघाडीला एकजुटीची संधी!!