• Download App
    जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या म्हणता आणि बायको, मुले आजारी पडली की मेदांतामध्ये दाखल करता, कुमार विश्वास यांनी केली अरविंद केजरीवालांची पोलखोल|Saying that world class infrastructure has been set up and admitting wife and children to Medanta when they fall ill, Kumar Vishwas slammed Arvind Kejriwal

    जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या म्हणता आणि बायको, मुले आजारी पडली की मेदांतामध्ये दाखल करता, कुमार विश्वास यांनी केली अरविंद केजरीवालांची पोलखोल

    दिल्लीमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या म्हणता. कोट्यवधी रुपये खर्च करून त्याच्या जाहिराती देता आणि बायको, मुले आणि मंत्री आजारी पडले की मेदांतामध्ये दाखल करता अशी टीका एकेकाळचे सहकारी असलेल्या कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केली आहे.Saying that world class infrastructure has been set up and admitting wife and children to Medanta when they fall ill, Kumar Vishwas slammed Arvind Kejriwal


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या म्हणता. कोट्यवधी रुपये खर्च करून त्याच्या जाहिराती देता आणि बायको, मुले आणि मंत्री आजारी पडले की मेदांतामध्ये दाखल करता

    अशी टीका एकेकाळचे सहकारी असलेल्या कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केली आहे.एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अण्णा आंदोलनातील केजरीवाल यांचे सहकारी कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्या दाव्यांची पोलखोल केली.



    कुमार विश्वास म्हणाले, वृत्तपत्रे आणि चॅनल्सना जाहिराती देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च केले. केरळमध्येही जाहिराती करून स्वत:चा चेहरा छापला. दिल्लीमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्याचा दावा करत आहात.

    परंतु, तुमची बायको, मुले किंवा मंत्री आजारी पडले की मेदांता या खासगी आलिशान रुग्णालयांत जाऊन झोपतात. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्हाला तेथेच बेड पाहिजे. उद्या मी शिक्षणमंत्री झालो आणि माझीच मुले जर परदेशात शिकायला गेली तर कसे वाटेल?

    विकास करण्यासाठी यांना आणखी किती वर्षे सत्ता पाहिजे असा सवाल करून कुमार विश्वास म्हणाले, यांना झोप कशी लागते हेच कळत नाही. यांची कातडी गेंड्याची झाली आहे.

    त्यांच्याभोवती सगळा मेहुणे-मेहुण्यांचा गोतावळा जमला आहे. सगळ्या बाजुने अशी गर्दी झाली की माणसाला सामान्यांचा आवाज ऐकू येत नाही. रावणाचेही असेच झाले होते. त्याला जेव्हा सत्याचा आवाज ऐकू आला तेव्हा खूप उशिर झाला होता.

    एकेकाळी अत्यंत जवळचे सहकारी असलेल्या कुमार विश्वास यांनीच केजरीवाल यांची पोलखोल केल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर कुमार विश्वास यांनी एक ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे की,

    माझा संताप अनावर झाल्याबद्दल माफी मागतो. एक चांगले काम करत असताना अचानक राग येण्यामुळे उर्जा वाया जाते. त्यामुळे आता कामाला सुरूवात करतो. कोविड किट घेऊन खूप गावांपर्यंत पोहोचायचे आहे.

    Saying that world class infrastructure has been set up and admitting wife and children to Medanta when they fall ill, Kumar Vishwas slammed Arvind Kejriwal

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य