विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेली विरोधी एकजुटीची 15 पक्षांची बैठक पाटण्यात पार पडली. या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. या पत्रकार परिषदेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, रक्त सांडले तरी चालेल, पण देश वाचवू, असा इशारा दिला. ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मोदी सरकारला रक्त सांडण्याचा इशारा दिला आहे की आम्हाला मते दिली नाहीत, तर तुमचे रक्त सांडू, अशी थेट जनतेलाच धमकी दिली आहे??, याची चर्चा देशपातळीवर रंगायला लागली आहे.Mamata banerjee called blood shedding, is it warning to Modi government or threatening the public??
नितीश कुमार यांच्या पुढाकाराने विरोधी ऐक्याच्या झालेल्या बैठकीला 15 पक्षांचे 27 नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत अनेक नेते हजर होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जम्मू-काश्मीरचे नेते ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, डाव्या पक्षांचे नेते सिताराम येचुरी, डी. राजा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हे पहिल्या फळीतले, तर खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे आदी दुसऱ्या फळीतले नेते उपस्थित होते.
या बैठकीत विरोधी एकजुटीवर भर देताना राहुल गांधींनी पाटण्यातून ज्या बैठकीची सुरुवात होते त्याची नंतर जनचळवळ बनते, असा इतिहास सांगितला. पण हा इतिहास त्यांनी अर्धाच सांगितला. कारण पाटण्यातून ज्याची सुरुवात होते, ती जन चळवळ बनते, हे खरे असले तरी पाटण्यात सुरुवात करण्यासाठी जयप्रकाश नारायण यांच्या उंचीचे नेते लागतात आणि समोर इंदिरा गांधी सारखा प्रभावी नेता लागतो. यापैकी मोदींच्या रूपाने समोर इंदिरा गांधींचा प्रभावी नेता आहे. पण पाटण्यात जमलेल्या 15 नेत्यांच्या 15 पक्षांच्या प्रमुख नेत्यांपैकी जयप्रकाश नारायण कोण??, हा मात्र प्रश्न कायम आहे.
त्या पलीकडे जाऊन ममता बॅनर्जी यांनी जो रक्त सांडू पण देश वाचवू, असा जो इशारा मोदी सरकारला दिला आहे, हा केवळ सरकारला इशारा आहे की जनतेलाच आम्हाला निवडून द्या अन्यथा रक्त सांडू!!, अशी धमकी दिली आहे?? असा सवाल तयार झाला आहे.
हिंसाचार बंगालच्या पाचवीला पुजलेला
कारण ममता बॅनर्जी 2021 मध्ये सत्तेवर आल्यापासून पश्चिम बंगाल मध्ये प्रत्येक छोट्या-मोठ्या निवडणुकीत हिंसाचारच झाला आहे. किंबहुना निवडणूक हिंसाचार हा पश्चिम बंगालच्या राजकीय व्यवस्थेला लागलेला शाप आहे. तो कम्युनिस्टांच्या सरकार पासून पुढे चालत आला आहे. कम्युनिस्टनशी लढताना तोच “वारसा” ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पुढे चालवत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तोंडी जी रक्त सांडण्याची भाषा आली, ती त्यांच्या राज्यातल्या राजकीय व्यवस्थेतूनच आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
पश्चिम बंगाल मध्ये जनतेचा आणि विरोधी पक्षांचा प्रखर विरोध असताना ममता बॅनर्जी सध्या स्थानिक पंचायत निवडणुका घेत आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे 20000 लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडून आणले आहेत आणि राज्यात ठिकठिकाणी निवडणूक हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या तोंडी रक्त सांडण्याची भाषा आल्याचे निरीक्षण काही राजकीय निरीक्षकांचे नोंदविले आहे.
Mamata banerjee called blood shedding, is it warning to Modi government or threatening the public??
महत्वाच्या बातम्या
- मायक्रोन गुजरातमध्ये उभारणार पहिला सेमीकंडक्टर प्लांट; 6,700 कोटींच्या गुंतवणुकीने 5,000 नोकऱ्यांची निर्मिती
- ‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत!
- बंगाल के माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांची कन्या होणार पुरुष, सुचेतना सेक्स चेंज केल्यानंतर सुचेतन बनणार
- ‘टायटॅनिक’चे अवशेष शोधण्यास गेलेल्या पाणबुडीचा स्फोट, सर्व पाच जणांचा मृत्यू