विशेष प्रतिनिधी
बेंगलोर : स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनाठायी टीका करून काँग्रेसवर तो मुद्दा बॅकफायर करू नये हे शरद पवारांनी कन्व्हिन्स केल्यानंतर राहुल गांधी “सुधारले”, पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक मधले मंत्री प्रियांक मात्र “घसरले”!!, असे म्हणायची वेळ प्रियांक यांच्याच नव्या वक्तव्याने आणली आहे. Sawarkar topic priyank kharge statement
कर्नाटकात बेळगावच्या विधिमंडळात लावलेले सावरकरांचे पोस्टर काढण्याचा चंग तिथल्या काँग्रेस सरकारने बांधला आहे, तर त्याला भाजपने तीव्र विरोध केला आहे. या मुद्द्यावरच प्रियांक खर्गे यांनी भाजपला सुनावताना सावरकरांवर टीका केली. ज्यांचे तत्त्वज्ञान समाजात नफरत फैलावते, त्यांचे पोस्टर विधानसभेत हवेच कशाला??, सावरकरांचे पोस्टर कर्नाटकच्या विधानसभेत नको हे आपले वैयक्तिक मत असल्याचे प्रियांक खर्गे म्हणाले.
प्रियांक खर्गे यांच्या नव्या वक्तव्यामुळे कर्नाटक बरोबरच देशात सावरकर मुद्दा पुन्हा पेटला असून प्रियांक खर्गे यांनी जे सावरकर पोस्टरला बेळगावच्या विधानसभेतून काढून टाकण्याची वकिली केली आहे, ते पोस्टर बसवराज बोम्मई सरकारने दोनच वर्षांपूर्वी विधानसभेत लावले आहे. हे पोस्टर काँग्रेस सरकारने अद्याप काढले नाही, पण त्यांचे मंत्री सावरकर विरोधात पुन्हा टीका टिप्पणी करू लागले आहेत.
राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात येऊन सावरकरांना माफीवीर म्हटले होते, त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रचंड राजकीय वाद उफाळला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. सावरकर हे समाज सुधारक होते. रत्नागिरीत जाती व्यवस्थेविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभारला होता, अशा स्पष्ट शब्दांमध्ये शरद पवारांनी राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या विरोधकांच्या आघाडीत समज दिली होती. सावरकरांच्या समाजकार्य विषयीची माहिती शरद पवारांनी त्या बैठकीत सविस्तरपणे दिली होती. मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील त्या माहितीला दुजोरा दिला होता. सावरकर मुद्दा काँग्रेसवर बॅकफायर होतो हे शरद पवारांनी राहुल गांधींना समजावून सांगितले होते.
त्यानंतर राहुल गांधींनी आपल्या टीका टिप्पणी मधून सावरकर मुद्दा वगळून टाकला होता. पण राहुल गांधींची ही राजकीय प्रगल्भता मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा आपल्या पुत्रामध्ये उतरवू शकले नाहीत. कर्नाटक विधानसभेतल्या पोस्टरच्या मुद्द्यावर प्रियांक खर्गे यांनी भाजपला सुनावताना सावरकरांवरच टीका केली. त्यामुळे आता सावरकर मुद्दा पुन्हा एकदा कर्नाटक सह देशात पेटला असून तीन राज्यांमध्ये मार खाल्ल्यानंतर आधीच बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसला सावरकर मुद्द्यावर आणखी बॅकफूटवर जावे लागले आहे.
Sawarkar topic priyank kharge statement
महत्वाच्या बातम्या
- काय सांगता! सूर्याला पडले 60 पृथ्वी मावतील एवढे छिद्र; वेगवान सौर वाऱ्यांमुळे रेडिओ कम्युनिकेशन ठप्प होण्याचा इशारा
- I.N.D.I.A ची बैठक खरगेंच्या घरी संपन्न; नितीश, स्टॅलिन आणि अखिलेश अनुपस्थित, ममता म्हणाल्या- 7 दिवसांपूर्वी सांगायला हवे होते
- मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नईत विध्वंस; 72 तास वीज गुल, इंटरनेट बंद; हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पोहोचवले अन्न
- अमित शहांनी लोकसभेत नेहरूंचे पत्रच वाचून दाखवले; म्हणाले- नेहरूंनीच शेख अब्दुल्लांना सांगितले होते, काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे चूक होती