• Download App
    सावरकरांच्या स्वप्नातला बलशाली भारत मोदींच्या नेतृत्वाखाली तयार होतोय; योगी आदित्यनाथ यांचा विश्वास |Savarkar's dream of a strong India is being built under Modi's leadership; Belief of Yogi Adityanath

    सावरकरांच्या स्वप्नातला बलशाली भारत मोदींच्या नेतृत्वाखाली तयार होतोय; योगी आदित्यनाथ यांचा विश्वास

    प्रतिनिधी

    लखनौ : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विसाव्या शतकात पाहिलेले बलशाली भारताचे स्वप्न एकविसाव्या शतकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार होताना दिसत आहे, असा आत्मविश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.Savarkar’s dream of a strong India is being built under Modi’s leadership; Belief of Yogi Adityanath

    प्रख्यात इतिहासकार विक्रम संपत यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्राच्या पहिल्या भागाच्या हिंदी अनुवादाचे आणि दुसऱ्या भागातील इंग्रजी चरित्राचे प्रकाशन योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौच्या मुख्यमंत्री निवासात झाले. त्यावेळी योगी बोलत होते.



    योगी आदित्यनाथ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लखनौ – गोरखपुर यांचे अनोखे नाते उलगडून दाखवले. योगी आदित्यनाथ यांचे परात्पर गुरु महंत दिग्विजय नाथ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनुयायी होते. उत्तर प्रदेशातील हिंदू महासभेचे नेते होते.

    लोकसभेतील खासदार होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हिंदुत्वाचा संदेश त्यांनी संपूर्ण उत्तर भारतात प्रचार प्रसारित केला. प्रख्यात क्रांतिकारक सचिंद्रनाथ संन्याल हे देखील सावरकरांचे सहकारी होते. ते लखनौचे होते, याकडे योगी आदित्यनाथ यांनी आवर्जून लक्ष वेधले.

    योगी म्हणाले की, सशस्त्र क्रांतिकारकांच्या इतिहास गेल्या शतकात भारतीयांच्या मनातून पुसून टाकण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु तो इतिहास डावे इतिहासकार पुसू शकले नाहीत. विक्रम संपत यांच्यासारख्या तरुण इतिहासकारांनी हा झाकलेला इतिहास पुन्हा प्रकाशात आणला, ही आनंदाची बाब आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या फाळणीला विरोध केला होता. बलशाली भारताचे स्वप्न त्यांनी विसाव्या शतकात बघितले होते.

    त्यासाठी शस्त्रसंपन्न होण्याचा मार्ग त्यांनी दाखविला होता. परंतु, त्या काळात राज्यकर्त्यांनी सावरकरांच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सावरकरांच्या स्वप्नातला बलशाली भारत एकविसाव्या शतकात आपल्या नजरेसमोर साकार होताना दिसतो आहे ही समाधानाची बाब आहे.

    चरित्रकार विक्रम संपत यांनी सावरकरांच्या आठवणी जागवल्या. त्याचबरोबर सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांविषयी इतिहास संशोधकांना मोठा वाव असल्याचे आवर्जून नमूद केले. सशस्त्र क्रांतीचे भारत एक मोठे केंद्र होते. रशिया आणि चीन यांच्या पेक्षा भारतातली सशस्त्र क्रांती वेगळी होती, याकडे विक्रम संपत यांनी लक्ष वेधले.

    Savarkar’s dream of a strong India is being built under Modi’s leadership; Belief of Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची