वृत्तसंस्था
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिवशी 28 मे 2024 रोजी अंदमानमध्ये रणदीप हुडा यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार आहे स्वतः रणदीप हुडा या श्रेणीला पोर्ट ब्लेअर मध्ये हजर राहणारा असून ते त्याच दिवशी सेल्युलर जेल मधल्या सावरकर कोठडीला भेट देणार आहेत. रणदीप हुडा यांनी ही माहिती दिली. Savarkar Jayanti Special Screening of the movie Freedom Savarkar in Andaman!!
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सावरकर शौर्य पुरस्कार विविध पुरस्कारांचे वितरण आज एका भव्य कार्यक्रमात झाले त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते रणदीप हुडा यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाला देशभरात या जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तो सिनेमा झळकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली सावरकरांचे देशाप्रतीचे योगदान भारतीय जनतेने स्वीकारून त्यांना अभिवादन केले याबद्दल रणदीप हुडा यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले.
पोर्ट ब्लेअर मध्येच सावरकर जयंती दिनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे त्याला हजर राहण्यासाठी रणदीप हुडा अंदमानला जाणार आहेत ते तिथे सेल्युलर जेल मधल्या सावरकर कोठडीला भेट देऊन सावरकरांचे दर्शन घेणार आहेत.
Savarkar Jayanti Special Screening of the movie Freedom Savarkar in Andaman!!
महत्वाच्या बातम्या
- 6 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट; उष्णतेमुळे राजस्थानमध्ये 2 दिवसांत 13 जणांचा मृत्यू
- 8 राज्यांतील 58 जागांवर 58.82% मतदान; बंगालमध्ये BJP उमेदवारावर हल्ला, पक्षाचा TMC वर आरोप
- चीनची तैवानला युद्धाची धमकी; म्हटले- जोपर्यंत तैवान आमचा भाग होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई करत राहू
- राजकोटच्या गेम झोनमध्ये अग्नितांडव, तब्बल 24 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये 12 मुले; DNA टेस्टद्वारे पटवणार ओळख