वृत्तसंस्था
भोपाळ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखनाचा विपर्यस्त हवाला देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गोमांस खाणे सावरकरांना मान्य होते, अशा स्वरूपाचे विधान केले आहे. त्याचबरोबर गाईला माता मानणे देखील चुक आहे, असे ते म्हणाले होते.Savarkar – Hindutva – Cow: Digvijay Singh’s brothers attack him; Laxman Singh said, like cow mother, eating beef is a sin
मात्र त्यांचे बंधू आणि मध्यप्रदेशातील चौचङा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण सिंह यांनी मात्र दिग्विजय सिंह यांच्या विधानाला विरोध केला असून गाय ही आमच्यासाठी मातेसमानच आहे आणि गोमांस खाणे हे आमच्या दृष्टीने पापच आहे, असे स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्यांनी ट्विटरद्वारे दिग्विजय सिंग यांना प्रत्युत्तर दिले आहे.
दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात हिंदू आणि हिंदुत्ववाद यात भेद आहे. सावरकरांना गोमांस खाणे निषिद्ध नव्हते. स्वतः सावरकरांनीच हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही, असे लिहिले आहे. याचा दाखला दिला होता. एवढेच नाही तर अनेक हिंदू गोमांस खातात, असाही दावा केला होता.
त्यानंतर दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपाकडून तसेच सोशल मीडियातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. मात्र दिग्विजय सिंह यांचे धाकटे बंधू आणि काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचे विधान खोडून काढले आहे. गाय ही आमची माताच आहे आणि गोमांस खाणे हे आमच्यासाठी पापच आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
केवळ सोशल मीडियातूनच नव्हे, तर आपल्या घरातूनच दिग्विजय सिंह यांना विरोध झाल्याने या विषयावर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. लक्ष्मण सिंह यांनी राहुल गांधींचे सॉफ्ट हिंदुत्व दिग्विजय सिंहांपेक्षा अधिक अनुसरले आहे का? लक्ष्मण सिंह यांची वाटचाल वेगळ्या राजकीय दिशेने सुरू झाली आहे का असे प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहेत.
Savarkar – Hindutva – Cow: Digvijay Singh’s brothers attack him; Laxman Singh said, like cow mother, eating beef is a sin
महत्त्वाच्या बातम्या
- मनी मॅटर्स : सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात अमाप खरेदीची सवय मोडा
- मेंदूचा शोध व बोध : रक्तपुरवठा करणाऱ्या मेंदूतील धमन्यांची लिष्ट रचना
- “सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत करत आहे की , वीज बिले चार पाच पट वाढवण्यात आली” ; सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मानवी बुद्धीच्या विकासात जनुकांचा मोठा सहभाग