भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावरही लागला होता ‘महादेव बेटिंग अॅप’वर सट्टा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बहुचर्चित ‘महादेव बेटिंग अॅप’च्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने आता धक्कादायक खुलासा केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, ‘महादेव बेटिंग अॅप’ ऑपरेट करणारे सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल पाकिस्तानमध्ये डी-कंपनीला मदत करत होते. Saurabh Chandrakar of Mahadev Betting App was related to D company and also supported by ISI
डी कंपनीच्या सांगण्यावरून सौरभ चंद्राकरने ‘महादेव बेटिंग अॅप’ ऑपरेट करण्यासाठी दाऊद इब्राहिमचा भाऊ मुस्तकीम इब्राहिम कासकर याच्यासोबत भागीदारी करून हे अॅप तयार केल्याचेही तपासात समोर आले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या तपासात २०२१ मध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर झालेली भागीदारी उघड झाली आहे. मुस्तकीम हा पाकिस्तानमध्ये बेटिंगवर देखरेख करत असल्याची माहितीही मिळाली होती. तो महादेव अॅपला सुरक्षा आणि लॉजिस्टिक सपोर्ट देत आहे. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांचे पाकिस्तानच्या खेलोइर अॅपशी कनेक्शनही तपासले जात आहे. यामध्ये आयएसआय कनेक्शनही समोर आले आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडी सातत्याने कारवाई करत आहे. सध्या ३०हून अधिक प्रसिद्ध व्यक्ती ईडीच्या रडारवर आहेत. पण काही लोक ईडीची कारवाई गांभीर्याने घेत नाहीत. रविवारी चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान महादेव अॅपच्या माध्यमातून अनेकांनी सट्टेबाजीचा खेळ खेळला. मुंबईतही येथून अनेक जण सट्टा खेळल्याचे आढळून आले आहे.
Saurabh Chandrakar of Mahadev Betting App was related to D company and also supported by ISI
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाचे मूळ काय? कसे मजबूत झाले ज्यू? वाचा सविस्तर
- नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता
- अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून??
- ५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!