वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त बोलून पंतप्रधान नरेद्र मोदींवर निशाणा साधणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा एक नवा खळबळजनक दावा केला आहे. मलिक यांच्या दाव्यानुसार 2024 मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी राममंदिरावर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो. मलिक यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.Satyapal Malik’s sensational statement again, BJP can go to any extent to win 2024
हे काहीही करू शकतात
सत्यपाल मलिक म्हणाले की, 2024 मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक राममंदिरावर हल्ला घडवून आणू शकतात किंवा भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याची हत्या घडवून आणू शकतात. जे लोक पुलवामा हल्ला घडवून आणू शकतात, ते काहीही करू शकतात. या लोकांना कशाचीही पर्वा नाही. ते चुकीच्या मार्गाने चालले आहेत, असा दावा मलिक यांनी केली.
सत्यपाल मलिक यांनी उलगडले पुलवामा हल्ल्यामागचे मोठे रहस्य
14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला केंद्रातील सरकार जबाबदार असल्याचे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. सत्यपाल मलिक म्हणाले की, केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती पण संरक्षण मंत्रालयाने ती नाकारली.
Satyapal Malik’s sensational statement again, BJP can go to any extent to win 2024
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!