विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नाडेला यांना नुकताच पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांचे आभार मानले आहेत. नाडेला यांनी ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.Satya Nadala, Chairman, Microsoft, thanked the Prime Minister
नाडेला म्हणाले, पद्म भूषण पुरस्कार मिळणे तसेच अनेक असामान्य लोकांबरोबर आपलीही खास ओळख निर्माण होणं हा मोठा सन्मान आहे. यासाठी मी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीयांचा आभारी आहे. यामुळे आता पुढे संपूर्ण भारतभरातील लोकांसाठी काम करताना त्यांना अनेक साध्य साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरासाठी मदत करत राहिनं”
सत्या नाडेला यांना २०१४ साली मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनवण्यात आले होते. सत्या नाडेला यांचा जन्म भारतातील हैदराबाद मध्ये १९६७ साली झाला होता. त्यांचे वडील एक प्रशासकीय अधिकारी होते. आई संस्कृत विषयातील प्राध्यापक होत्या.
त्यांनी प्राथमिक शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूलमधून केल्यानंतर १९८८ मध्ये मणिपाल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून इलेक्ट्रिक इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते कम्प्यूटर सायन्स मध्ये एमएस करण्यासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी १९९६ मध्ये शिकागो मध्ये बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये एमबीए केले.
Satya Nadala, Chairman, Microsoft, thanked the Prime Minister
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीमध्ये संतापजनक घटना , एका बलात्कार पीडित महिलेचं केलं मुंडण ; तोंडाला फासल काळं
- राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव
- वैद्यकीय महाविद्यालयांच्या अध्यापकांच्या मानधनात वाढ होणार
- धुळ्यात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद; पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला
- ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे पुण्यामध्ये निधन
- महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचे देशाला दर्शन; राजपथावर चित्ररथाने अनेकांची मने जिंकली