- लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स
विशेष प्रतिनिधि
पुणे : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. आपल्या वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टी सारा तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते. सध्या साराने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टद्वारे तिने सर्वांना तिच्या लंडनमधील उच्च शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे. Sara Tendulkar news!
साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘धीरुभाई अंबानी
इंटरनॅशनल स्कूल’ मुंबई येथे झालं आहे. यानंतर साराने उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला. गेल्या काही वर्षांपासून सारा ‘कॉलेज ऑफ लंडन’मध्ये वैद्यकशास्त्राचं (मेडिसीन) शिक्षण घेत होती. या अभ्यासक्रमाचा निकाल आता विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे. साराने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे.
शुबमन गिलबरोबरचा डीपफेक फोटो, बनावट अकाऊंटमुळे सारा तेंडुलकर संतापली!
सारा तेंडुलकर या कोर्समध्ये ७५ टक्क्यांहून (डिस्टिंक्शन) अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झालेली आहे. तिने तिच्या निकालपत्राचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विषयात चांगला अभ्यास करुन करिअर घडवायचं हे साराचं आधीपासूनचं स्वप्न होतं.
Sara Tendulkar news!
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेत शिकणाऱ्या पदवीधर भारतीय विद्यार्थी संख्येने गाठला उच्चांक!!
- युद्धानंतर गाझाचे भविष्य काय असेल, अमेरिकेसोबत कसे सुरू आहे नियोजन? इस्रायलच्या राजदूत म्हणाले…
- हैदराबादमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग; चार दिवसांच्या चिमुकल्यासह ९ जणांचा होरपळून मृत्यू
- काँग्रेस मध्य प्रदेशात सोन्याचे महाल बांधणार, पण बटाट्यातून सोने काढून का??; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला