प्रतिनिधी
मुंबई : स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्याने संस्कृत लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव संस्कृत भारती प्रचार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून हे यंदाचे तिसरे वर्ष आहे. महोत्सवाचे आयोजन १६ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (प.) येथे करण्यात येणार आहे.Sanskrit Bharati Sanskrit Short Film Festival organized on 16th January
लघुपट तयार करताना स्पर्धकांनी लघुपटाचा कालावधी १० मिनिटांशिवाय अधिक असू नये, याची खबरदारी घ्यायची आहे. लघुपट पूर्णपणे संस्कृत भाषेतच तसेच चालू घडामोडींवर आधारित असावा. माहितीपट ग्राह्य धरला जाणार नसून पॅनलमधील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चित्रपटातील कन्टेन्ट किंवा रॉयल्टी संबंधित कोणत्याही विवादांसाठी सहभागी स्पर्धक पूर्णपणे जबाबदार असतील, याची स्पर्धकांनी कृपया नोंद घ्यावी.
व्हिडिओ १० डिसेंबर २०२१ पूर्वी पाठविण्याचे आवाहनही यावेळी आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. महोत्सवातील लघुपटाचा निकाल १६ जानेवारी २०२२ रोजी आयोजित कार्यक्रमात घोषित केला जाईल.
प्रथम ३ लघुपटांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे. इच्छुक आपले नाव https://forms.gle/vpK4h1Kpg97m8vwZA या लिंकवर नोंद करू शकतात.
नोंदणी फी १०० रुपये असून A/C No. : 020110100006451
A/C Type : SB, IFSC code: TJSB0000020, A/c Name : SAMSKRITA BHARATI (KONKAN), Branch : Dombivli ( East ), Thane Janata Sahakari Bank Ltd या बँक खात्यावर पैसे जमा करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी महेश परळकर (9769545758) यांच्याशी संपर्क साधावा.
Sanskrit Bharati Sanskrit Short Film Festival organized on 16th January
महत्त्वाच्या बातम्या
- लोकल गुरुवारपासून सुसाट धावणार, १०० टक्के फेऱ्या सुरु होणार; प्रवाशांना मोठा दिलासा
- गृहराज्यमंत्री देसाई यांचा पोलिस ठाण्यामध्ये प्रवेश पोलिसांची झाडाझडती, आरोपी शोधण्याचे आदेश
- ‘स्पेशल २६’ लवकरच रिलीज करतोय – नवाब मलिक
- टाटा कंपनीचे १८० शहरात एक हजार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क; महामार्गावर सुद्धा योजना
- माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यन खानची ड्रग्जची केस मुंबई हायकोर्टात लढणार