• Download App
    संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या तीनही वर्षांच्या शिक्षा वर्गांचे अभ्यासक्रम बदलणार!! Sangha will change the curriculum of all three years of education

    संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या तीनही वर्षांच्या शिक्षा वर्गांचे अभ्यासक्रम बदलणार!!

    देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर संघात महत्वपूर्ण बदल

    विशेष प्रतिनिधी

    भूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 2025 मध्ये शताब्दी आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांच्या मार्गदर्शनातून संघाने शताब्दीची पंचसूत्री तयार केली असून समरसता ते स्वदेशी या आधारावर संघ विस्तार हे त्याचे मुख्य सूत्र आहे. Sangha will change the curriculum of all three years of education

    त्याचवेळी संघ शिक्षा वर्गांचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय देखील संघाने घेतला आहे. मोदी सरकारने देशात नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने “स्वदेशी” या तत्त्वावर सरकारने भर दिला आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा अनेक अभ्यासक्रमांमध्ये आवर्जून समावेश केला आहे. या पार्श्वभूमीवर संघाने देखील प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष या संघ शिक्षा वर्गांचे अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेऊन तो 2024 पासून अंमलात आणण्याचा मनसूबा आखला आहे. संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या कार्यक्रमांमध्ये लोकाभिमुख परिवर्तन करण्याची ही तयारी आहे.

    संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान गुजरातमधल्या भूजमध्ये होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराची पुनर्स्थापना, त्याचबरोबर संघातल्या विविध वार्षिक प्रशिक्षण वर्गात मधला अभ्यासक्रम बदल आदी विषयांवर देखील व्यापक विचारविनिमय होणार आहे.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक यावर्षी गुजरातमधील कच्छ प्रांतातील भूज येथे आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक 5, 6 आणि 7 नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संघाच्या रचनेनुसार एकूण ४५ प्रांतातील प्रांत संघचालक, कार्यवाह आणि प्रांत प्रचारक आणि त्यांचे सहसंघचालक, सहकार्यवाह आणि सह प्रांत प्रचारक सहभागी होणार आहेत.

    बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह श्री दत्तात्रेय होसाबळे आणि सह-सरकार्यवाह श्री डॉ. कृष्णगोपाल, श्री डॉ. मनमोहन वैद्य, श्री मुकुंदा, श्री अरुण कुमार, श्री रामदत्त चक्रधर आणि कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सर्व अखिल भारतीय अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ यासह विविध समविचारी संघटनांचे निवडक संघटन मंत्री देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.

    यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बैठकीच्या विषयाची माहिती देताना संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, समाजातील बदलांची संघात नेहमी चर्चा होते, त्याप्रमाणे अपेक्षित बदलांची चर्चा होईल, संघ शिक्षा वर्गांच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची योजना आहे. २०२४ मध्ये आगामी संघ शिक्षा वर्गांमध्ये नवीन अभ्यासक्रम दिला जाईल. संघाचे पहिल्या दोन वर्षांचे अभ्यासक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात, तर तृतीय वर्षाचा शिक्षा वर्ग फक्त नागपूर मध्ये संघ मुख्यालयात होत असतो. तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गाला संघात सर्वाधिक महत्त्व आहे आणि त्याच्या अभ्यासक्रमात बदल करून तो 2024 मध्ये अंमलात आणण्याची योजना आहे. संघातला हा अत्यंत महत्त्वपूर्ण बदल आहे

    २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणारा श्री राम मंदिर अभिषेक सोहळा आणि त्यासंबंधित देशभरातील प्रस्तावित कार्यक्रमांवर बैठकीत चर्चा केली जाईल. देशभरातील प्रत्येक शहरात आणि गावातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये कार्यक्रम करण्याचे योजिले आहे.या महत्वाच्या कार्यात संघ कसा सहभागी होईल यावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे, आणि त्यानंतर सर्व स्वयंसेवकांना त्याबाबत माहिती दिली जाईल.



    संघाची शताब्दी

    २०२५ मध्ये संघ कार्याला सुरुवात होऊन १०० वर्षे पूर्ण होत आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य १९२५ मध्ये सुरु झाले होते, संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी हे कार्य सुरू केले होते, ९८ वर्षे हे कार्य अखंडपणे सुरु आहे. २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण होणार असल्याने कार्य विस्तार योजनेवर सातत्याने काम सुरू आहे, अनेकांनी आपला वेळ दिला, शताब्दी विस्तारकही बाहेर पडले. हे लक्षात घेऊन या संदर्भात निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांचा दर सहा महिन्यांनी शाखा कार्याच्या विस्ताराबाबत सातत्याने आढावा घेतला जात असून, या बैठकीत ते उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. पुढील दीड वर्षात आपण आपले ध्येय कसे साध्य करू? या संदर्भात चर्चा होणार असून आत्तापर्यंत काय घडले याचा आढावा घेण्याबरोबरच त्याला आणखी गती कशी देता येईल यावरही विस्तृत चर्चा होणार आहे.

    शताब्दी वर्षाच्या संदर्भात येणाऱ्या काळात ते समाजासमोर कसे आणायचे? त्या विषयावर चर्चा होईल. आपल्या विजयादशमीच्या भाषणात आदरणीय सरसंघचालकांनी शाखेच्या आजूबाजूच्या परिसरात सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.

    संघ शताब्दीची पंचसूत्री

    समरसता, पर्यावरण, समाधानी परिवार जीवन, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये अशी पाच आवाहने देखील करण्यात आली, ज्यासाठी स्वयंसेवकांना समाजाला बरोबर घेऊन पुढे मार्गक्रमण करावयाचे आहे.

    या सर्व कामांना गती देण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. देशभरातून ३८१ कार्यकर्ते येणार आहेत, कार्यकारी मंडळाच्या बैठकीत संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व आहे. देशात जशी संघाच्या कार्याची चर्चा होते, तसेच जमिनीवरील अनुभवांशी संबंधित व्यावहारिक मुद्द्यांवरही चर्चा होईल. अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक ५ तारखेला सकाळी ९ वाजता सभा सुरू होईल आणि ७ तारखेला संध्याकाळी ६ वाजता संपेल.

    Sangha will change the curriculum of all three years of education

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!