• Download App
    Chief Minister Yogi सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे

    Chief Minister Yogi : सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे अन् तो सुरक्षित ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य – मुख्यमंत्री योगी

    Chief Minister Yogi

    ज्यांनी हिंदूंच्या पवित्र स्थळांचा नाश केला, त्यांचे कुळ आणि वंश नष्ट झाले, असंही योगी म्हणाले


    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या: Chief Minister Yogi  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या धामच्या अश्रफी भवन आश्रमात आयोजित भव्य अष्टोत्तरशत 108 श्रीमद भागवत पाठ आणि पंच नारायण महायज्ञात सहभाग घेतला. मुख्यमंत्री योगी यांनी महायज्ञात वैदिक मंत्रांसह नैवेद्य अर्पण करून राज्यातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे आणि तो सुरक्षित ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.Chief Minister Yogi



    ते म्हणाले की, धर्म आणि संस्कृतीतून समाजात सकारात्मकता आणि शांतता पसरते. ऐतिहासिक मंदिरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांचा उल्लेख करून ते म्हणाले की, ज्यांनी या पवित्र स्थळांचा नाश केला, त्यांचे कुळ आणि वंश नष्ट झाले. औरंगजेबाचे कुटुंबीय आज रिक्षा चालवत आहेत. ही त्यांची दुर्दशा आहे. त्यांनी मंदिरे उध्वस्त न करता चांगली कामे केली असती तर त्यांची अशी अवस्था झाली असती का? सनातन धर्माच्या माध्यमातूनच जागतिक शांतता प्रस्थापित होऊ शकते. हा सनातन धर्म आहे, जो सृष्टीच्या आरंभापासून चालत आला आहे.

    सीएम योगी म्हणाले की, वारसा आणि विकास यांच्यात चांगला समन्वय असायला हवा. अयोध्येत होत असलेल्या विकासकामांचा उल्लेख करून ते म्हणाले की, संतांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम डबल इंजिन सरकारने केले आहे. रामललाच्या भव्य मंदिराची उभारणी आणि अयोध्या धामचा विकास हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

    हा यज्ञ केवळ आत्मशुद्धी आणि पर्यावरण शुद्धीकरणाचे माध्यम नसून सनातन धर्माचे रक्षण करतो आणि समाजात सकारात्मक ऊर्जा पसरवतो. ते म्हणाले की, हा कार्यक्रम माँ सरयूच्या पवित्र परिसरात आणि भगवान श्री राम जन्मस्थानावर आयोजित केला जात आहे, ज्यामुळे हा यज्ञ आणखीनच खास बनतो.

    Sanatan Dharma is the national religion of India and it is the duty of all of us to protect it – Chief Minister Yogi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही