विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Yogi Adityanath सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. प्रयागराज या ठिकाणी सुरु असलेला कुंभ मेळा हा विशिष्ट जात किंव धर्मासाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.Yogi Adityanath
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ हे एनडीटीव्हीच्या विशेष कार्यक्रमात उपस्थित त्यावेळी त्यांनी सनानत धर्म हा राष्ट्रधर्म असल्याचे सांगितले. योगी म्हणाले, माणुसकी हा आपला धर्म आहे. पूजा करण्याचा, देवाला वंदन करण्याचा प्रकार वेगवेगळा असेल मात्र धर्म एकच आहे आणि तो सनातन धर्म आहे. कुंभमेळा त्याच सनातन धर्माचं प्रतीक आहे असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले, कुंभमेळ्यात सहा कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमान कुंभमेळा काळात स्नान करणं पवित्र मानलं जातं. कुंभ मेळ्याने एकतेचा संदेशच दिला आहे. यामध्ये कुठलाही भेदाभेद नाही. जे लोक सनातन धर्मावर टीका करतात त्या सगळ्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की इथे येऊन पाहा. एवढंच नाही तर २६ जानेवारीच्या दिवशी प्रयागराज या ठिकाणी सुमारे तीन कोटी लोक पवित्र स्नान करण्यासाठी पोहचले आहेत असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी हे ४५ दिवस महाकुंभ मेळ्याचे आहेत. येणाऱ्या पिढ्यांसाठी हे अविस्मरणीय दिवस असतील याबाबत माझ्या मनात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कुंभमेळ्याचं आयोजन कसं करायचं याबाबत एक दृष्टीकोन दिला होता. त्यामुळे आम्ही त्याच अनुषंगाने यासाठी काम करत आहोत. कुंभमेळ्याने एकतेचा संदेश संपूर्ण देशात दिला आहे. ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याठिकाणी सर्वांगिण विकासाचा पाया आपोआप रचला जातो असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
Sanatan Dharma is the national religion of India, according to Yogi Adityanath
महत्वाच्या बातम्या
- विद्वत्त शिरोमणी पंडित देवदत्त पाटील यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अभिवादन मानपत्र समर्पित!!
- Jammu and Kashmir : प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा कट उधळला
- लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन करणाऱ्या खलिस्तानवाद्यांना तिथल्या तिथे भारतीयांचे चोख प्रत्युत्तर!!
- Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसले भारताच्या सशस्त्र दलांचे शक्तिप्रदर्शन