वृत्तसंस्था
तिरुअनंतपूरम : केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध सतत तोफा डागणारी INDI आघाडी राज्यांच्या राजकारणामध्ये किती भुसभुशीत आहे याचे चित्र पश्चिम बंगाल, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये दिसलेच, पण ते केरळमध्ये अधिक गहिरे झाले. केरळ मध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी हे एकमेकांना अशा पद्धतीने भिडले की, जणू काही त्यांच्याचकडे हिंदुत्वाचा खरा वारसा आहे, असे समजून त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकमेकांवर कुरघोडी केली.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केरळमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी यांच्यात जुंपली. यासाठी निमित्त झाले, ते केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे नारायण संस्थानच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे. त्यांनी त्या कार्यक्रमात सहभाग घेऊन सनातन धर्म संस्कृती विषयी काही उद्गार काढले. त्यावर कम्युनिस्ट मुख्यमंत्री सध्या भाजप आणि संघाचे लांगुलचालन करण्यात मग्न झाल्याची टीका काँग्रेसचे केरळ मधले वरिष्ठ नेते व्ही. डी. सतीशन यांनी केली. सनातन धर्म हा या देशातला मुख्य प्रवाह आहे. परंतु, काही लोकांनी त्याच्याविषयी गैरसमज पसरवला आहे. हिंदू आणि हिंदुत्व या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्या कोणाची ठेकेदारी नाहीत. पण आता केरळचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री पिनराई विजयन सनातन धर्माविषयी बोलून संघ परिवाराचे लांगुलचालन करू लागले आहेत, असे टीकास्त्र सतीशन यांनी सोडले.
सतीश यांच्या टीकेला कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या एनी राजा यांनी उत्तर दिले. या एनी राजांनी वायनाड मध्ये 2019 मध्ये राहुल गांधींविरुद्ध निवडणूक लढवली होती. सतीश यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप खोटे आहेत. कम्युनिस्ट पार्टी हीच केरळ मधला सेक्युलरिझमचा मुख्य फोर्स आहे. उलट सतीशन हेच सनातन धर्म हा मुख्य प्रवाह असल्याचे सांगून संघ परिवाराचे लांगूलचालन करतात, असा आरोप एनी राजा यांनी केला. पुढच्या वर्षी केरळ विधानसभेच्या निवडणुका आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब करून आपण मुख्यमंत्री होऊ असे सतीशन यांना वाटत असेल, तर तसे घडणार नाही, असा टोला एनी राजा यांनी लगावला.
केरळ मधले काँग्रेसचे आणि कम्युनिस्ट पार्टीचे नेते असे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकमेकांच्या विरोधात भिडले. जे नेते मोदी विरोधात एक होऊन आरोळ्या ठोकतात, तेच आपापल्या राज्यांमध्ये राजकारणासाठी एकमेकांचे कसे गळे धरतात, हे या निमित्ताने उघड्यावर आले.
Sanatan Dharma is the cultural legacy of our nation
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!
- INDI alliance : नेतृत्व पदासाठी सर्कस सुरू; ममतांचे नाव पिछाडीवर, अखिलेश यादवांचे नाव आघाडीवर!!
- South Korea : दक्षिण कोरियात विमान अपघात, 179 जणांचा मृत्यू; लँडिंगदरम्यान चाके उघडली नाहीत, भिंतीला धडकताच मोठा स्फोट