विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सगळ्या देशभरात आणि अगदी परदेशातही सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे त्याचवेळी राहुल गांधी + मनोज जरांगे + तेजस्वी यादव आणि एम. के. स्टालिन यांनी वेगवेगळ्या आंदोलनांची टूम काढली आहे. या सगळ्यांच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे देशातल्या सगळ्यात मोठ्या सार्वजनिक उत्सवात अडथळा आणणाऱ्यांच्या सनातन विरोधकांची एकजूट झाली आहे.
देशभरात आज सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम सुरू झाली. ठिकठिकाणच्या मंडपामध्ये गणेश मूर्ती विराजमान झाल्या. सगळीकडे गणेशोत्सवाचा मोठा जल्लोष सुरू झाला. देशभरातले आणि परदेशातले कोट्यावधी गणेश भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आज आला. पण सनातन धर्माच्या विरोधकांना नेमकी आजच आंदोलनाची टूम सुचली. राहुल गांधींनी मतदाराधिकारी यात्रा काढली. त्या यात्रेत आजच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के. स्टालिन यांना पोहोचायचे सुचले. त्यांना गणेश चतुर्थी शिवाय दुसरा कुठलाही राजकीय मुहूर्त दिसला नाही. बिहार मधल्या मुजफ्फरपूर मध्ये येऊन त्यांनी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
त्याचवेळी महाराष्ट्रात मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवायची संधी घ्यावीशी वाटली. गणेशोत्सवामध्ये मुंबईत प्रचंड गर्दी होत असताना नेमकी गणेशोत्सवाच्या गर्दीत आंदोलन करायची टूम मनोज जरांगे यांनी काढली. मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाला त्यांनी गणेश उत्सव सोडून आंदोलनात सामील व्हायचे आवाहन केले. सुमारे 1200 गाड्या घेऊन ते अंतरवाली सराटीतून बाहेर पडले. त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाची स्तुती केली पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर अश्लाघ्य टीका केली. मराठे सुद्धा हिंदूच आहेत. गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही असेच आंदोलन आम्ही करू, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. उच्च न्यायालयाने त्यांना मुंबईत येऊन आंदोलन करायची बंदी घातली तरी मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा हट्ट सोडलेला नाही.
Sanatan Dharm opposition parties agitation on Ganesh chaturthi
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार, उध्दव ठाकरेंनी मराठा समाजासाठी काय केले? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल
- आर्थिक गैरव्यवहार, राष्ट्रीय सुरक्षेला धक्का, महुआ मोइत्रा यांच्या पतीवर गंभीर आरोप
- अथर्व सुदामेने फक्त एक व्हिडिओ डिलीट केला; तर सेक्युलर भारतावर हिंदुत्वाची ढगफुटी झाली!!
- Bangladesh : बांगलादेशने म्हटले- पाकिस्तानने 1971च्या नरसंहाराबद्दल माफी मागावी; पाकिस्तानी मंत्री म्हणाले- दोनदा मागितली