प्रतिनिधी
नागपूर : भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान यांच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पप्पू ऊर्फ अमित साहू आणि त्याची गॅंग सना खानचा वापर हनी ट्रॅप सारखा करून लोकांकडून पैसे उकळायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सना खान अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवायची. त्यांची अवघडलेल्या स्थितीतील छायाचित्र मिळवायची आणि त्यानंतर सनाची गँगचा त्यांच्याकडून पैसे उकळायचे. तिने या गुन्ह्यात गँगने मिळवलेल्या पैशातला वाटा मागायला सुरुवात केल्यानंतर तिचा कायमचा काटा काढण्यासाठी खून केल्याची कबुली पप्पूने दिली आहे.Sana Khan murder case: Police say she was used as ‘honey-trap’ in sextortion ring run by husband
नागपूरच्या सीताबर्डीतील एका व्यापाऱ्याने लाखो रुपये या गँगला दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकारात नेमके कोणाला ओढायचे हे पप्पू त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती पाहून ठरवत असे. त्यानंतर सनाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीसोबतचे अवघडलेल्या स्थितीतील छायाचित्र मिळाल्यानंतर साहू व त्याच्या गँगमधील सदस्य पीडित व्यक्तीला फोन करून पैशाची मागणी करत असत.
सना खान यांच्या माध्यमातून पप्पू ऊर्फ अमित शाहू हा ‘सेक्सटोर्शनचे रॅकेट’ चालवीत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्याने या माध्यमातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या लोकांची कोट्यवधींनी लुबाडणूक केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सना खान आणि पप्पू साहू यांची चार वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली. यानंतर वाराणसीला जात असताना, त्याने सना खान यांना जबलपूर येथून बिर्याणीचा डबा दिला होता. तेव्हापासून त्याची आणि सना खान यांची पक्की मैत्री झाली आणि त्यानंतर प्रेमात रूपांतर झाले. यानंतर जबलपूरनजीकच्या कटंगी येथे आशीर्वाद ढाबा सुरू करण्यासाठी सना खान यांनी पप्पू शाहूशी व्यावसायिक भागीदारी सुरू केली.
सना आणि पप्पू एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यातून एप्रिल महिन्यात दोघेही विवाहबंधनात अडकले. यानंतर पप्पू शाहू याला सना हिचे अनेकांसोबत व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली. त्याने ते व्हिडिओ आणि फोटो आपल्याकडे ठेवले. या व्हिडिओंमध्ये नागपूरसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही राजकीय पदाधिकारी आणि बड्या आसामींचा समावेश आहे.
पप्पूने सना खानच्या या व्हिडिओंचा वापर करीत, त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यासाठी दबाव टाकला. त्यातून सना खान यांनी अनेकांची कोट्यवधींनी लुबाडणूक केली. सना खान या गॅंगशी मार्च २०२१ मध्ये जुळल्या गेली होती. या रॅकेटच्या माध्यमातून शाहूने मोठी संपत्ती जमवली होती.
दरम्यान या संपत्तीतील पैसे सातत्याने सना खान मागत असल्याने तिला कायमचे संपविण्याच्या उद्देशातून त्याने तिचा खून केला. या प्रकरणात शाहू याच्या विरुद्ध ३८४, ३८६, ३८९, ३५४ (ड), १२० (ब) आणि ३४ कलमाअंतर्गत व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (इ), ६७, ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sana Khan murder case: Police say she was used as ‘honey-trap’ in sextortion ring run by husband
महत्वाच्या बातम्या
- केजरीवालांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसला दिले आव्हान; ‘’I-N-D-I-A मध्ये ‘निकाह’पूर्वीच तीन तलाक’’ भाजपाने लगावला टोला!
- सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव; 56 कोटींच्या कर्जासाठी बँकेची कारवाई
- लडाखमध्ये भीषण रस्ते अपघात, 9 सैनिक ठार; एक जखमी, कियारी शहराजवळ लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले
- द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर