• Download App
    शेतकरी आंदोलकांशी संवादाची केंद्राची तयारी; शेतकरी मात्र नव्या आंदोलनाच्या पवित्र्यात; २६ जूनला निदर्शने|Samyukta Kisan Morcha will organise protests outside Raj Bhawans across the country on June 26

    शेतकरी आंदोलकांशी संवादाची केंद्राची तयारी; शेतकरी मात्र नव्या आंदोलनाच्या पवित्र्यात; २६ जूनला निदर्शने

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकारने पुन्हा शेतकरी आंदोलकांशी चर्चेची तयारी दाखविली असताना शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांनी मात्र आंदोलनाचा नवा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार २६ जूनला सर्व राज्यांमधीलराजभवनांसमोर निदर्शने केली जाणार आहेत.Samyukta Kisan Morcha will organise protests outside Raj Bhawans across the country on June 26

    कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास या दिवशी सात महिने पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शेतकरी २६ जून रोजी विरोध प्रदर्शनावेळी विविध राज्यांमधील राज्यभवनाबाहेर काळे झेंडे दाखवून निदर्शने करतील.



    संयुक्त किसान मोर्चा प्रत्येक राज्याच्या राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठवेल. तसेच, हा दिवस शेती वाचवा, लोकशाही वाचवा दिवस म्हणून देखील पाळला जाणार असल्याचे ऑल इंडिया किसान सभेचे इंद्रजित सिंग यांनी सांगितले आहे.

    शेतकरी आंदोलकांशी संवाद पुन्हा सुरू करण्याची तयारी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दाखवली आहे. तथापि, हे कायदे रद्द करण्यात यावेत आणि किमान हमीभावांबाबत कायदेशीर खात्री द्यावी या मागण्यांवर शेतकरी संघटना अद्याप अडून आहेत.

    हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे ५० शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी राजधानीच्या सर्व सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे.

    शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. मात्र, अशी कोणतीही योजना नसल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

    Samyukta Kisan Morcha will organise protests outside Raj Bhawans across the country on June 26

     

    Related posts

    Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याचा प्रस्ताव फेटाळला; लोकसभा-राज्यसभेत विरोधकांनी महाभियोग प्रस्ताव आणला होता

    Zagros Mountains : सील टीम-6 ने पर्वतावरून अमेरिकन पायलटला वाचवले; इराणमध्ये 300 किमी आत घुसून ऑपरेशन पार पाडले

    Nanded Gang War : नांदेड गँगवॉरने पुन्हा हादरले; सत्ताधारी शिवसेनेच्या युवा सेना शहराध्यक्षाची भररस्त्यात हत्या; 3 दिवसांत 5 मर्डर