Sambit Patra hit back at Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यात भाजप आणि आरएसएसवर जम्मू-काश्मीरमधील बंधुत्वाची भावना भंग केल्याचा आरोप केला आहे. यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले. Sambit Patra hit back at Rahul Gandhi on His Kashmir Remarks Says problem arisen due to Neharus appeasement
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यात भाजप आणि आरएसएसवर जम्मू-काश्मीरमधील बंधुत्वाची भावना भंग केल्याचा आरोप केला आहे. यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले. पात्रा म्हणाले, ‘राहुल गांधींनी पुन्हा एकदा काश्मीरबाबत चुकीची माहिती दिली आहे. ते धार्मिक तुष्टीकरणाबद्दल बोलले. राहुल गांधींनी स्वतःला काश्मिरी पंडित म्हटले आणि तेथील समस्येबद्दल दुःख व्यक्त केले. काश्मीरमध्ये जी काही समस्या आहे ती नेहरूंमुळे आहे. तुमच्या तुष्टीकरणामुळे तेथे समस्या राहिली.
भाजप प्रवक्ते म्हणाले, ‘अमित शाह जेव्हा कलम 370 हटवण्यासाठी उभे राहिले, तेव्हा सोनिया गांधींच्या सांगण्यावर अधीर रंजन चौधरी म्हणाले की, हे द्विपक्षीय आहे आणि यासाठी पाकिस्तानला विचारले का? आज काश्मीरमधील भेदभाव संपत आहे आणि देश विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
संबित पात्रा म्हणाले, ‘आम्ही माँ वैष्णव देवीच्या स्थळाला पिंडीया म्हणतो आणि राहुल गांधी त्याला सिम्बॉल म्हणतात. ते आमच्या भावना दुखावत आहेत. मोदीजींच्या आगमनानंतर आम्ही मातेची शक्ती कमी झाल्याबाबत ते बोलत आहेत. तुम्ही जीएसटीची तुलना लक्ष्मी माँशी का करत आहात, तुम्ही आधी त्याची तुलना गब्बर सिंहशी केली होती. मातेची शक्ती कमी होत नाही. शेतकरी मातेसमोर म्हणाले की, शेतकऱ्यांना लाभ होत आहे. मोदीजींच्या आगमनानंतर माँ भारतीची शक्ती वाढली आहे. शिवजी, वाहे गुरू का हात, काँग्रेसचा हात सांगणे त्यांची अपरिपक्वता दर्शवते. तर दिग्विजय सिंह फक्त पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून बोलतात.
राहुल गांधींची आरएसएस-भाजपवर टीका
शुक्रवारी जम्मूमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी जम्मू -काश्मीरला येतो तेव्हा मला वाटते की मी घरी आलो आहे. माझ्या कुटुंबाचे जम्मू -काश्मीरशी जुने नाते आहे. ते म्हणाले की, मला येथे आल्याचा आनंद आहे, पण दुःखदेखील आहे. दुःखाचे कारण असे आहे की, संघ आणि भाजप येथे बंधुत्वाची भावना तोडण्याचे काम करत आहेत.
लोक म्हणतात की, हाताच्या चिन्हाचा अर्थ आशीर्वाद आहे, याचा अर्थ आशीर्वाद नाही, तर याचा अर्थ घाबरू नका, सत्य बोलण्यास घाबरू नका असा आहे, म्हणून हे चिन्ह काँग्रेस पक्षाचे प्रतीक आहे आणि भाजप सत्याला घाबरत आहे. राहुल गांधी म्हणाले की, भाजप लोकांसाठी भीती आहे आणि तर काँग्रेस प्रेम आहे. जम्मू -काश्मीरला राज्याचा दर्जा परत केला पाहिजे. ते म्हणाले की, आज सकाळी जेव्हा मी काश्मिरी पंडित शिष्टमंडळाला भेटलो तेव्हा ते म्हणाले की, भाजपने आमच्यासाठी काहीही केले नाही, पण काँग्रेसने आमच्यासाठी बरेच काही केले आहे. तुम्हाला प्रत्येक धर्मात हाताची निशाणी दिसेल.
Sambit Patra hit back at Rahul Gandhi on His Kashmir Remarks Says problem arisen due to Neharus appeasement
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचा दहा चौरस किमी परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित, मांस आणि मद्यविक्रीवर बंदी
- स्पेनमध्ये धार्मिक सौहार्दाचे उदाहरण, गणपती बाप्पाची मिरवणूक चर्चमध्ये दाखल, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला व्हिडिओ
- ममता सरकारच्या छळ आणि धमक्यांमुळे पत्रकाराचा बंगाल सोडून दिल्लीत आश्रय, नुपूर शर्मा यांनी व्यक्त केल्या वेदना
- काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा गंभीर आरोप, म्हणाले- यूपी निवडणुकीत केंद्र सरकार अफगाणिस्तान संकटाचा फायदा घेणार!
- मोठी बातमी : पंतप्रधान मोदींची शीख बांधवांसाठी खास भेट, देशव्यापी ‘गुरुद्वारा सर्किट’ विशेष रेल्वेची घोषणा