काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका ट्विटवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी मुझफ्फरनगरमधील किसान पंचायतीसंदर्भात आपल्या ट्विटमध्ये जुना फोटो वापरले. किसान महापंचायतीमध्ये किती गर्दी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न फोटोच्या माध्यमातून करण्यात आल्याचा भाजपचा आरोप आहे. Sambit patra Criticizes rahul gandhi on His tweet says it has become his habit to use a gun on another shoulder
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका ट्विटवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी मुझफ्फरनगरमधील किसान पंचायतीसंदर्भात आपल्या ट्विटमध्ये जुना फोटो वापरले. किसान महापंचायतीमध्ये किती गर्दी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न फोटोच्या माध्यमातून करण्यात आल्याचा भाजपचा आरोप आहे.
फोटो ट्विट करताना राहुल गांधींनी लिहिले, “डटा है, निडर है, इधर है, भारत का भाग्यविधाता.” मात्र, आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी मुझफ्फरनगरमधील किसान पंचायतीचा उल्लेख केलेला नाही.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर हल्लाबोल केला. पात्रा म्हणाले, “आपल्या संघटनेला पुढे न नेणे, संघटनेला अध्यक्षविहीन ठेवणे, परिश्रम न घेणे आणि इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवणे चालवण्याचा प्रयत्न करणे ही राहुल गांधी यांची सवयच झाली आहे.
ते म्हणाले, “जेव्हा जेव्हा भ्रमाचे, असत्याचे राजकारण होते, तेव्हा त्यात राहुल गांधींचा हात नेहमीच असतो. आज राहुल गांधीजी यांनी शेतकरी आंदोलनाचे जुना फोटो ट्विट केला आहे आणि सध्याच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.
पात्रा म्हणाले, “राहुल गांधी हे चांगल्या प्रकारे जाणतात की काँग्रेस अध्यक्षविहीन आहे, त्यामुळे काँग्रेस गाउंडवर कोणताही मुद्दा मांडण्यास असमर्थ आहे. म्हणूनच ते खोट्या फोटोंद्वारे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपचे प्रवक्ते अमिल मालवीय यांनीही राहुल गांधी यांच्या ट्वीटवर निशाणा साधला. मालवीय यांनी लिहिले की, “महापंचायतीचे यश दाखवण्यासाठी राहुल गांधींना जुन्या फोटोचा आधार घ्यावा लागला, हे दर्शवते की, शेतकरी पंचायतीमध्ये प्रचंड गर्दी कशी पसरवली गेली. ज्या प्रकारे धार्मिक घोषणा दिल्या जातात त्यावरून त्यांचा खरा हेतू काय आहे हे सिद्ध होते.”
याआधी रविवारी मुझफ्फरनगर येथील किसान महापंचायतीदरम्यान राकेश टिकैत यांनी भारत सरकारची तुलना तालिबानशी केली होती. टिकैत म्हणाले होते की, अफगाणिस्तानमध्ये जाहीरपणे तालिबान आहेत, तर देशात पडद्यामागे तालिबान आहे. भाजपने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि या वक्तव्याला त्यांची मानसिक दिवाळखोरी म्हटले होते.
Sambit patra Criticizes rahul gandhi on His tweet says it has become his habit to use a gun on another shoulder