• Download App
    Waqf सुधारणा नाकारून संभलचा खासदार जिया उर रहमान बर्कने भारतावर सांगितला मालकी हक्क!!

    Sambhal MP : Waqf सुधारणा नाकारून संभलचा खासदार जिया उर रहमान बर्कने भारतावर सांगितला मालकी हक्क!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Waqf सुधारणा नाकारून उत्तर प्रदेशातील संभलचा खासदार जिया उर रहमान बर्कने थेट भारतावरच मालकी हक्क सांगितला. मुसलमान या देशाचे नोकर नाहीत, मालक आहेत, अशी दर्पोक्ती बर्कने केली. बर्कच्या या वक्तव्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण झाली. या देशातल्या साधन संपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे, असे मनमोहन सिंग राष्ट्रीय विकास परिषदेत म्हणाले होते. त्यावरून मोठ्या गदारोळ उठला होता.

    आता waqf सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत लोकसभेमध्ये बोलताना अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या संभलच्या खासदाराने म्हणजेच जिया उर रहमान बर्कने देशावरच मालकी हक्क सांगितला. फाळणीच्या वेळी ज्या मुसलमानांना पाकिस्तानात जायचे होते, ते त्या देशात निघून गेले.



    उरलेले मुसलमान भारतात राहिले. ते देशभक्त आहेत. मुसलमान या देशाचे नोकर नाहीत, तर या देशाचे मालक आहेत. तुम्ही Waqf board चे अधिकार हिरावून घेऊन मुसलमानांचे हक्क संपवू शकत नाही, अशी दमबाजी जिया उर रहमान बर्कने केली.

    खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महात्मा गांधी असल्याचा आव आणत waqf सुधारणा विधेयकाची प्रत लोकसभेत फाडली.

    Sambhal MP claims ownership right over India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Odisha High Court : ओडिशा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप: सहा वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपीची फाशी नमाज पठण करतो म्हणून रद्द

    PM Modi : पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- येथील अनेक सहकाऱ्यांचे पूर्वज बिहारचे

    ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे जोरदार लॉन्चिंग, पण त्यात पवारांनी उरकून घेतले सुप्रिया सुळेंसह दुसऱ्या फळीच्या नेत्यांचेही उप लॉन्चिंग!!