• Download App
    समाजवादी पार्टीचे वयोवृद्ध खासदार शफिक उर रहमान बर्क यांची नव्या संसदेत नमाजासाठी जागेची मागणी Samajwadi Party's veteran MP Shafiq ur Rehman Bark's demand for a place for namaz in the new Parliament

    समाजवादी पार्टीचे वयोवृद्ध खासदार शफिक उर रहमान बर्क यांची नव्या संसदेत नमाजासाठी जागेची मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हिंदू समाजासंदर्भात नेहमीच वादग्रस्त विधाने करणारे समाजवादी पार्टीचे वयोवृद्ध खासदार शफिक उर रहमान बर्क यांनी नव्या संसदेत नमाज पठणासाठी जागेची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपवरच नफरत फैलावण्याचा आरोप केला आहे. Samajwadi Party’s veteran MP Shafiq ur Rehman Bark’s demand for a place for namaz in the new Parliament

    गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काल नव्या संसदेचे काम सुरू झाले. आज लोकसभेत 33% महिला आरक्षण विधेयकही मांडण्यात आले. या विधेयकाला समाजवादी पार्टीचा विरोध आहे. मात्र त्याच पक्षाचे 93 वर्षांचे खासदार शफिक उर रहमान बर्क यांनी नव्या संसदेत नमाज पठणासाठी जागा मागितली आहे. भाजपचे सरकार मुसलमानांविरुद्ध नफरत फैलावत राहते. ते काय नमाज पठणासाठी मुसलमानांना जागा देणार??, असा सवालही बर्क यांनी केला आहे.

    जुन्या संसदेतल्या अखेरच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात वयोवृद्ध खासदार म्हणून याच शफिक उर रहमान बर्क यांचा गौरव केला होता. मात्र त्यांनीच भाजप मुसलमानांविरुद्ध नफरत फैलावतो, असे सांगत नव्या संसदेत नमाज पठणासाठी जागा मागितली आहे.

    Samajwadi Party’s veteran MP Shafiq ur Rehman Bark’s demand for a place for namaz in the new Parliament

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Cold Allergy : सर्दी आणि अ‍ॅलर्जीच्या औषधांचे नमुने फेल, विक्रीवर बंदी; YL फार्माच्या लेव्होसेटीरिझिन-डायहायड्रोक्लोराइड टॅब्लेटचा दर्जा आढळला निकृष्ट

    Stray Dogs : भटक्या कुत्र्यांवर SCने पुन्हा सरकारांकडून उत्तर मागितले; म्हटले- सर्व मुख्य सचिव झोपलेत, येऊन सांगा की प्रतिज्ञापत्र का दिले नाही!

    Home Minister : देशातील 1466 वीरांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक; पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला ठार मारणाऱ्या 20 पोलिसांना सन्मानित केले जाईल