• Download App
    माफियाच्या भावाला पक्षात घेतल्याले समाजवादी पक्ष अडचणीत, भाजपकडून टीकेचा भडीमार|Samajwadi party gets in trouble

    माफियाच्या भावाला पक्षात घेतल्याले समाजवादी पक्ष अडचणीत, भाजपकडून टीकेचा भडीमार

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुन्हेगारीकडून राजकारणाकडे वळलेल्या मुख्तार अन्सारीचा भाऊ सिबगतुल्ला अन्सारीला पक्षात प्रवेश दिल्यावरून भाजपने टीकेची झोड उठविली.
    बसपचे माजी आमदार असलेल्या सिबगतुल्ला अन्सारी यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच समाजवादी पक्षात प्रवेश केला.Samajwadi party gets in trouble

    त्यावरून भाजपच्या उत्तर प्रदेश शाखेने ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. डॉन मुख्तार अन्सारीच्या कुटुंबीयांना पक्षात प्रवेश देऊन तुम्ही कोणत्या समाजवादाबद्दल गप्पा मारता, असा सवाल करणारे ट्विट भाजपने केले आहे.



    त्याचप्रमाणे, भाजपने मुख्तार अन्सारीचा व्हिडिओही ट्विटसोबत जोडला आहे.सिबगतुल्ला यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यावरही भाजपने ट्विटरवरून समाजवादी पक्षाला लक्ष्य केले होते. ‘समाजवादी पक्षाचा हाच खरा चेहरा आहे.

    सत्तेच्या लालसेपोटी हा पक्ष माफिया मुख्तार अन्सारीच्या नातेवाईकांशी हातमिळवणी करण्यास तयार आहे. मात्र, उत्तर प्रदेशात कोण मुख्यमंत्री आहेत, हे समाजवादी पक्षाने विसरता कामा नये, असे ट्विट भाजपने केले होते.

    Samajwadi party gets in trouble

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan : पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, अरुणाचलवरील चीनच्या दाव्याला दिला पाठिंबा; भारताने दिले प्रत्युत्तर

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- मंदिरातील देणगी ही देवाची मालमत्ता; बँका वाचवण्यासाठी नाही

    Anil Ambani : अनिल अंबानी समूहाची १,१२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; आतापर्यंत १०,११७ कोटी रुपये जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई