• Download App
    Samajwadi MLA Mehboob Ali slapped with law मुस्लिम लोकसंख्या वाढली, भाजपची सत्ता खेचणार म्हणणाऱ्या समाजवादी आमदार महबूब अलींना कायद्याचा दणका!!

    मुस्लिम लोकसंख्या वाढली, भाजपची सत्ता खेचणार म्हणणाऱ्या समाजवादी आमदार महबूब अलींना कायद्याचा दणका!!

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : देशात मुस्लिमांची संख्या वाढली आहे. तिच्या आधारे भाजपची सत्ता आम्ही घालवू, असे दमबाजीचे वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार महबूब अली यांना कायद्याचा दणका बसला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. Samajwadi MLA Mehboob Ali slapped with law

    बिजनोर मध्ये संविधान बचाव कार्यक्रमांमध्ये बोलताना महबूब अली यांनी भाजप विरोधात तडाखे बंद भाषण केले. पण ते भाषण करताना त्यांनी देशवासीयांविरुद्ध देखील गरळ ओकली. देशात मुस्लिमांची संख्या वाढली आहे. त्या संख्येचा वापर करून 2027 मध्ये आम्ही भाजपची सत्ता खाली खेचू. या देशात मुघलांनी 800 वर्ष राज्य केले, पण त्यांचे राज्य टिकले नाही, तर भाजप काय चीज आहे?? मुस्लिम लोकसंख्येच्या बळावर त्यांची सत्ता आम्ही खाली खेचून काढू, असे महबूब अली म्हणाले.

    या वादग्रस्त भाषणाची दखल घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांनी महबूब अली यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलाच, पण त्याच वेळी बिजनोरचे एसपी झाकीर शेख यांच्या विरोधात देखील एफआयआर दाखल केला. कारण त्यांनीच संबंधित संविधान बचाव कार्यक्रमाला परवानगी दिली होती. त्यामध्ये महबूब अली यांनी वादग्रस्त भाषण केल्यानंतर देखील त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली नव्हती. परंतु महबूब अली यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आणि त्यांना कायद्याचा दणका दिला.

    Samajwadi MLA Mehboob Ali slapped with law

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला