वृत्तसंस्था
तिरुअंनतपुरम : देशातील सर्वात सुशिक्षित आणि देवभूमी असलेल्या केरळ राज्याने वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.Salute to the nursing staff: Vaccination in Kerala in excess of the vaccine dose; Vaccination of 87 thousand people
विशेषतः मानवी सेवेमध्ये म्हणजे नर्सिंगमधील ही कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. राज्याकडे आलेल्या कोरोना लसीच्या डोसपेक्षा अधिक लसीकरण करून नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
राज्याला लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून 73 लाख 38 हजार 806 डोस मिळाले होते. परंतु नर्सनी 74 लाख 26 हजार 164 नागरिकांचे लसीकरण केले.
म्हणजे 87 हजार 358 अतिरिक्त नागरिकांना डोस दिले. डोसपेक्षा लसीकरण जास्त असे कसे झाले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग, त्याचे उत्तर असे,प्रत्येक वायलमध्ये (लसीच्या कुपीत) 10 डोस असतात, मात्र त्या व्यतिरिक्त त्यात एखादा डोस जास्त असतो.
पण, त्याचा अपव्यय होऊ शकतो. मात्र, केरळ येथील नर्सिंग स्टाफनी सूक्ष्म नियोजन आणि बारकाईने काम करून ते काही डोस वाचविले आणि नागरिकांना दिले .केरळच्या मुख्यमंत्र्यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली.