वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आपल्या अयोध्या विषयक पुस्तकात हिंदुत्व आणि कट्टर इस्लामी हिंसक दहशतवादी संघटना आयएसआयएस तसेच बोको हराम यांच्याशी यांची एकाच तागडीत तुलना करणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी वादात सापडल्यानंतर घुमजाव केले आहे.Salman Khurshid’s tour; Now he said, “Hindutva and ISIS – Boko Haram are not the same but similar
आपण हिंदुत्वाची तुलना कट्टर इस्लामी दहशतवादी संघटना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्याशी करताना त्यांना same म्हटलेले नाही तर similar म्हटले आहे, अशा शब्दांचा खेळ सलमान खुर्शीद यांनी केला आहे.
सलमान खुर्शीद यांनी आयोध्या निकालासंदर्भात लिहिलेल्या पुस्तकात हिंदुत्व आणि कट्टर इस्लामी दहशतवादी संघटना यांची तुलना केली आहे. त्यावरून देशात प्रचंड राजकीय वादळ उठले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग, पी. चिदंबरम त्याचबरोबर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील त्यांचे समर्थन केले आहे.
परंतु देशभरातून सलमान खुर्शीद यांच्यावर जबरदस्त टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर आज सलमान खुर्शीद यांनी आपले मूळ विधान बदलत घुमजाव केले आहे. ते म्हणाले की, मी हिंदुत्वाला आयएसआयएस आणि बोको हराम same म्हटले नाही तर similar म्हटले आहे.
त्याही पलिकडे पलीकडे जाऊन आयएसआयएस आणि बको हराम या हिंसक दहशतवादी संघटना इस्लामचा दुरुपयोग करतात, अशी टीका देखील मी केली आहे. पण त्यावर कोणत्याही मुस्लिम संघटनेने माझ्यावर आक्षेप घेतला नाही. मी मुस्लिमांची प्रतिमा खराब करतो आहे असे कोणत्याही मुस्लिम संघटनेने म्हटलेले नाही,असा दावाही सलमान खुर्शीद यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे देखील नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Salman Khurshid’s tour; Now he said, “Hindutva and ISIS – Boko Haram are not the same but similar
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी